Ganpat Gaikwad: खळबळजनक… BJP आमदाराने शिंदे गटाच्या नेत्यावर पोलीस स्टेशनमध्येच झाडल्या 4 गोळ्या

मिथिलेश गुप्ता

02 Feb 2024 (अपडेटेड: 03 Feb 2024, 06:27 AM)

BJP MLA Ganpat Gaikwad Firing: कल्याण पूर्वमधील शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केल्याची धक्कादायक घडली आहे.

sensational bjp mla ganpat gaikwad shot 4 bullets at shivsena shinde group leader mahesh gaikwad inside the police station kalyan

sensational bjp mla ganpat gaikwad shot 4 bullets at shivsena shinde group leader mahesh gaikwad inside the police station kalyan

follow google news

Bjp MLA Ganpat Gaikwad firing: उल्हासनगर: कल्याण पूर्वमधील शिवसेना (शिंदे गट) महाराष्ट्राचे माजी नगरसेवक आणि नेते महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर हिल लाईन पोलीस ठाण्यात गोळीबार (firing) करण्यात आल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे.. खळबळजनक बाब म्हणजे हा जीवघेणा हल्ला भाजपचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड (BJP MLA Ganpat Gaikwad) यांनी स्वतः केला आहे. या हल्ल्यात महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले असून, महेश गायकवाड यांचे मित्र आणि शिंदे समर्थक राहुल पाटील हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. त्याच्यावर सध्या ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (sensational bjp mla ganpat gaikwad shot 4 bullets at Shivsena shinde group leader mahesh gaikwad inside the police station kalyan )

हे वाचलं का?

प्राथमिक माहितीनुसार हा गोळीबार भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनीच केला असल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा हल्ला पोलीस स्टेशनमध्येच करण्यात आला आहे.

आमदार गणपत गायकवाड यांनी महेशवर एकूण चार गोळ्या झाडल्या. घटनेनंतर जखमी महेश यांना उल्हासनगरच्या मीरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण तिथे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना 11 वाजेच्या सुमारास ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.

नेमकं प्रकरण काय?

या हल्ल्यानंतर महेश गायकवाड यांचे समर्थक प्रचंड संताप व्यक्त करत आहेत. दुसरीकडे संपूर्ण रुग्णालय त्यांच्या समर्थकांनी भरली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यात अनेक दिवसांपासून जमिनीवरून काही वाद सुरू होता. याच वादातून २ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा दोन्ही नेते हे आपल्या समर्थकांसह उल्हासनगर हिल लाईन पोलिस ठाणे येथे पोहचले होते. याचवेळी आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी अचानक गणपत गायकवाड यांनी आपल्या जवळच्या बंदुकीतून थेट महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडण्यास सुरूवात केली. यावेळी गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर एका पाठोपाठ एक अशा चार गोळ्या झाडल्या. महेशच्या पोटात आणि इतर अवयवांना चार गोळ्या लागल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजते आहे.

महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक

 

यावेळी शिवसेनेचे नेते आणि महेश गायकवाड यांचे मित्र राहुल पाटील यांनाही गोळी लागली आहे. ज्यामध्ये ते देखील गंभीर जखमी झाले आहेत.

राहुल पाटीलही जखमी

 

दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण कल्याण-डोंबिवली शहरात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेची स्थितीही लक्षणीयरीत्या बिघडू शकते. यामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला कठोर पावलं उचलावी लागण्याची शक्यता आहे.

भाजप-शिंदे गटात ठिणगी पडली?

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून कल्याण लोकसभा मतदार संघात धुसफूस सुरूच आहे. या मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे हे भाजप आमदारांना काम करू देत नसल्याचे आरोप सातत्याने होत आहेत. दुसरीकडे भाजपकडून देखील श्रीकांत शिंदेंना देखील वारंवार टार्गेट करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत आजच्या गोळीबाराच्या धटनेने भाजप आणि शिवसेना यांच्यात ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

    follow whatsapp