Uddhav Thackeray: 'उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात, धोका देणारे सच्चे हिंदू नाहीत...', शंकराचार्यांच्या विधानाने मोठी खळबळ

मुंबई तक

15 Jul 2024 (अपडेटेड: 15 Jul 2024, 09:10 PM)

Uddhav Thackeray News : शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता. सदर प्राणप्रतिष्ठा सोहळा शास्त्रानुसार होत नसल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यांच्या या भूमिकेचे उद्धव ठाकरे यांनी जोरदार समर्थन केले होते.

 shankaracharya avimukteshwarananda of joshimath reached udhhav thackeray matoshree residence

ठाकरे कुटुंबियांनी यांनी यावेळी शंकराचार्यांचे आशीर्वाद घेऊन पादुका पूजन केले.

follow google news

बातम्या हायलाइट

point

उद्धव ठाकरे यांनी निवासस्थानी त्यांची पूजा केली.

point

शंकराचार्यांचे आशीर्वाद घेऊन पादुका पूजन केले.

point

मी ठाकरे कुटुंबीयांच्या विनंतीनुसार येथे आलो.

Shankaracharya Avimukteshwarananda Reached udhhav thackeray matoshree : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेवर बहिष्कार घालणारे ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी निवासस्थानी त्यांची पूजा देखील केली. ठाकरे कुटुंबियांनी यांनी यावेळी शंकराचार्यांचे आशीर्वाद घेऊन पादुका पूजन केले. या पूजनानंतर शंकराचार्य  अविमुक्तेश्वरानंद यांनी 'उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला, त्यांना धोका देणारे खरे हिंदू नाहीत', असे विधान केले आहे. (shankaracharya avimukteshwarananda of joshimath reached udhhav thackeray matoshree residence)  

हे वाचलं का?

ठाकरेंच्या निवासस्थानी झालेल्या या पुजेला ठाकरेंचे संपूर्ण कुटुंबिय उपस्थित होते.यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह अनेक नेते देखील उपस्थित होते. या नेत्यांना देखील यावेळी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचे आशीर्वाद घेतले. विशेष म्हणजे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता. सदर प्राणप्रतिष्ठा सोहळा शास्त्रानुसार होत नसल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यांच्या या भूमिकेचे उद्धव ठाकरे यांनी जोरदार समर्थन केले होते. 

हे ही वाचा : Pooja Khedkar : पूजा खेडकरांचा तिसऱ्या दिव्यांग प्रमाणपत्राचा 'खेळ'? Inside Story

शंकराचार्य काय म्हणाले? 

मी ठाकरे कुटुंबीयांच्या विनंतीनुसार येथे आलो. त्यांनी माझे स्वागत केले. आम्ही सर्वजण हिंदू धर्म व सनातन धर्म पालन करणारे आहोत. आपल्याकडे पाप-पुण्याची भावना सांगण्यात आली आहे. गोहत्या हे सर्वात मोठे पाप आहे. पण त्याहून मोठा घात हा विश्वासघात आहे. हाच घात उद्धव ठाकरे यांच्यासोबत झाला आहे. ही वेदना अनेकांच्या मनात आहे. ही वेदना उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होईपर्यंत दूर होणार नाही, असे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यावेळी बोलताना म्हणाले.

अविमुक्तेश्वरानंद पुढे म्हणाले की, कुणाचे हिंदुत्त्व खरे आहे हे माहिती करून घ्यावे लागेल. पण विश्वासघात करणारा हिंदू नसतो. पण विश्वासघात सहन करणारा मात्र निश्चितच हिंदू असतो. त्यामुळे विश्वासघात करणारे कसे हिंदू असतील? उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला. महाराष्ट्रातील समस्त जनतेला ही वेदना ठावूक आहे. निवडणुकीतही ही गोष्ट सिद्ध झाली आहे. सरकार पाडून जनमताचा अनादर करणे ही चांगली गोष्ट नाही, असे ते म्हणाले.

हे ही वाचा : Vishalgad : "...ही घटना टळली असती"; शाहू महाराज संतापले, सरकारला सुनावले

केदारनाथ दिल्लीत बांधून घोटाळा 

दिल्लीत केदारनाथ मंदिर बांधण्याच्या मुद्याचाही अविमुक्तेश्वरानंद यांनी यावेळी समाचार घेतला. आपल्याकडे 12 ज्योतिर्लिंग आहेत. केदारनाथ हिमालयात आहे. त्याला दिल्लीला नेण्याची काय गरज आहे. तसेच केदारनाथ येथून 228 किलो सोने गायब झाले. पण मीडिया ते दाखवत नाही. त्याचा तपासही केला जात नाही. आता दिल्लीत केदारनाथ बांधून घोटाळा करत आहेत, असे ते म्हणाले.

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी नुकतीच उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांच्या लग्नाला हजेरी लावली होती. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांची भेट घेतली होती. यावर बोलताना अविमुक्तेश्वरानंद यांनी यावेळी मोदी आपले शत्रू नसल्याचे स्पष्ट केले. आमचा नरेंद्र मोदींना विरोध नाही. ते आमच्याकडे आले होते. त्यांनी आम्हाला नमस्कार केला. आम्हीही त्यांना आशीर्वाद दिले. आम्ही त्यांचे शत्रू नाही. पण त्यांची चूक झाली की आम्ही बोलणारच, असे ते म्हणाले. 

    follow whatsapp