Sharad Pawar Gautam Adani Meeting : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा उद्योगपती गौतम अदाणी यांच्यासोबत दिसले. एका कार्यक्रमात शरद पवार रिबन कापत आहेत. त्यांच्या बाजूला गौतम अदाणी हे उभे आहेत. हे छायाचित्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून, राजकीय वर्तुळात या भेटीबद्दल असंख्य प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. दुसरीकडे पवार अदाणी भेटीवरून भाजपने इंडिया आघाडी आणि राहुल गांधींना खिंडीत गाठलं आहे. भाजपचे नेते हिमंत बिस्वा सरमा यांनी थेट राहुल गांधींनाच सवाल केला आहे.
ADVERTISEMENT
सीएम हिमंता बिस्वा शर्मा आणि अमित मालवीय यांनी केला सवाल
या फोटोबद्दल अमित मालवीय यांनी X वर लिहिले की, ‘राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यातील मतभेद यापेक्षा अधिक स्पष्ट होऊ शकत नाहीत. इंडिया आघाडी अनेक आघाड्यांवर तुटत आहे.’ त्याचवेळी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी या फोटोवरून प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, ‘शरद पवार अदाणींना वारंवार भेटतात तेव्हा राहुल गांधी गप्प का असतात? एका कार्यक्रमात शरद पवार अदाणींसोबत दिसले, तेव्हा राहुल गांधी आणि काँग्रेस गप्प का? हे सोयीचे राजकारण आहे, ब्लॅकमेलिंग आहे’, असं म्हणत सरमा यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींना लक्ष्य केलं आहे.
राहुल गांधी अदाणींबद्दल विचारताहेत प्रश्न
राहुल गांधी यांनी अनेकवेळा अदाणी आणि पीएम मोदी यांच्यातील संबंधांवर थेट प्रश्न उपस्थित केले आहेत. विशेषत: हिंडेनबर्ग अहवाल समोर आल्यानंतर त्यांनी या मुद्द्यावरून भाजप आणि केंद्र सरकारवर कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु शरद पवार हे सातत्याने वेगळी भूमिका घेताना दिसले. शरद पवार उद्योगपती गौतम अदाणी यांच्यासोबत दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी खुद्द अदाणी यांनीही शरद पवार यांची त्यांच्या घरी सिल्व्हर ओक वर जाऊन भेट घेतली होती.
शरद पवार-अदाणी यांची अहमदाबादमध्ये झाली भेट
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी यांची शनिवारी 23 सप्टेंबर रोजी अहमदाबादमध्ये भेट झाली. निमित्त होते, भारतातील पहिल्या लॅक्टोफेरिन प्लांटच्या उद्घाटनाचे. त्यानंतर शरद पवार यांनी गौतम अदाणी यांच्या घरी आणि कार्यालयालाही भेट दिली. शरद पवार यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, ‘गौतम अदाणी यांच्यासमवेत वसना, चाचरवाडी, गुजरात येथे भारतातील पहिल्या लॅक्टोफेरिन प्लांट एक्झिमपॉवरचे उद्घाटन करणे हा सुदैवाची गोष्ट आहे.’
हेही वाचा >> ‘शरद पवारांचे दोन नेते आमच्याकडे येणार’, गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट
मोठी गोष्ट म्हणजे विरोधी पक्षांची ‘इंडिया’ आघाडी हिंडनबर्ग-अदाणी प्रकरणाची संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) चौकशीची मागणी सातत्याने करत आहे. 2024 मध्ये होणारी लोकसभा निवडणूक भाजपच्या विरोधात एकजूट करून लढण्याच्या तयारीत असताना अदाणी आणि पवार यांची ही भेट अधिक महत्त्वाची ठरते. काँग्रेस खासदार राहुल गांधी सातत्याने अदाणींना विरोध करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीतील बड्या नेत्यांपैकी एक आहेत.
शेहजाद पूनावाला यांनी राहुल गांधींवर साधला निशाणा
जेव्हा शरद पवार यांनी X वर अदाणींसोबतचे फोटो पोस्ट केले, तेव्हा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, ‘हा फोटो हजार शब्द बोलत आहे, पण जर राहुल गांधींना ते ऐकायचे असतील.’ पूनावाला म्हणाले की, ‘विरोधी आघाडीत राहुल गांधींना कोणीही गांभीर्याने घेत नाही.’
शरद पवार इंडिया आघाडीच्या तत्त्वांच्या विरोधात का जातात?
शरद पवार आघाडीच्या तत्त्वांच्या विरोधात जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. जून आणि एप्रिलमध्ये त्यांनी अदाणी यांची दोनदा भेट घेतली होती. 2 जून रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदाणी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यापूर्वी एप्रिलमध्येही अदाणी आणि पवार यांच्यात बैठक झाली होती.
हेही वाचा >> Afzal Guru ला फाशी देताच जेलर ढसाढसा रडला, कधीही समोर न आलेला ‘हा’ किस्सा जरूर वाचा!
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधक आणि विरोधी ऐक्याच्या मुद्द्यांपासून दूर राहण्याची किंवा पक्ष किंवा आघाडीचा अजेंडा ठरवलेल्या मुद्द्यांपासून दूर राहण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही ते मोदी पदवी प्रकरण, जेपीसी चौकशी, सावरकर वाद प्रकरणावर वेगवेगळ्या भूमिका मांडल्या आहेत.
अदाणी यांच्या भेटीशिवाय शरद पवार आणि अजित पवार यांच्या वारंवार होणाऱ्या बैठकानीही इंडिया आघाडीसाठी धोक्याची घंटा वाजल्या आहेत. अलीकडेच, टिळक ट्रस्टच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींसोबत स्टेज शेअर केला होता.
ADVERTISEMENT