Ncp Sharad Pawar Ajit pawar : राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पडल्यानंतर आता पवार कुटुंबात देखील फूट पडल्याचं चित्र आहे. अजित पवारांनी सत्तेत सहभागी झाल्यानतंर केलेल्या भाषणामध्ये शरद पवारांवरच निषाणा साधला, त्यामुळे या राजकीय भूकंपामुळे पवार कुटुंबातच कलह निर्माण झाल्याच्या चर्चा आहेत.
ADVERTISEMENT
अशातच मंगळवारी (12 जुलै) अजित पवार पवारांनी त्यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांची भेट घेतली, तर दुसरीकडे श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यास सुरुवात झाली.
शरद पवार विरुद्ध अजित पवार, 2019 मध्ये काय घडलं होतं.
2019 मध्ये भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानतंर अजित पवार श्रीनिवास पवार यांच्याकडेच थांबले होते. त्यानतंर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात श्रीनिवास पवार यांनी मध्यस्ती केली होती, असं नंतर म्हटलं गेलं. आता पुन्हा पक्षात फूट पडलेली असताना श्रीनिवास पवार यांचे पुत्र आणि अजितदादांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे युगेंद्र पवार नेमके कोण आहेत हे समजावून घेणं महत्त्वाचं ठरतं.
शरद पवारांची भेट घेतल्यानंतर युगेंद्र यांनी एकोनॉमिक टाईम्सला प्रतिक्रिया दिली. त्यामध्ये ते म्हणाले, ‘शरद पवारांची वयक्तिक कामासाठी भेट घेतली. मी माझ्या आजोबांना अनेकदा भेटतो.’
वाचा >> अजित पवार अमोल मिटकरींना महिन्याला 50 हजार का पाठवायचे?, मुंबई Tak वर मोठा खुलासा
राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये समेट घडवणार का, याबाबत बोलताना युगेंद्र म्हणाले, ‘मला तर्कवितर्कांवर काहीही बोलायचे नाही. मी पहिल्यांदा आजोबांना भेटत नाहीये, मी त्यांच्यासोबत अनेकदा प्रवास केला आहे.’ पुढे युगेंद्र म्हणाले, ‘श्रीनिवास आणि अजितदादा भाऊ आहेत. आम्ही राजकारणात नाही. आम्ही राजकारण आणि कुटुंब वेगळं ठेवतो. पवार कुटुंब नेहमीच एकत्र असेल.’
युगेंद्र पवार कुणाच्या बाजूने?
पवारांची घेतलेली भेट नेहमीप्रमाणेच होती असं युगेंद्र यांनी म्हंटलं असलं तरी राष्ट्रवादीच्या फुटीमध्ये त्यांनी केलेले ट्विट खूप काही सांगून जातात, अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर युगेंद्र यांनी ट्विट करत अजितदादांचं अभिनंदन केलं होतं.
वाचा >> DRDO Scientist : प्रदीप कुरुलकरने कंत्राटासाठी महिलेसोबत ठेवले शरीर संबंध
त्यांच्या ट्विटमध्ये युगेंद्र म्हणाले होते, ‘अजितदादा पवार साहेब यांची महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.’ तर दुसरीकडे शरद पवार यांचा येवल्याच्या सभेला जातानाचा फोटो ट्विट करत युगेंद्र म्हणतात, ‘मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ… शीशे से कब तक तोडोगे…मिटने वाला मैं नाम नहीं… तुम मुझको कब तक रोकोगे… साहेब’
कोण आहेत युगेंद्र पवार?
युगेंद्र यांच्या या दोन ट्विटमुळे ते पवार कुटुंबात समेट घडवतात का अशा चर्चा सुरु होत्या. युगेंद्र सक्रीय राजकारणात नाहीत पण ते नेमके कोण आहेत आणि पवार कुटुंबामध्ये त्यांचं काय महत्त्व आहे ते समजावून घेऊयात.
युगेंद्र पवार हे अजित पवारांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत. शरयु अँग्रो या कंपनीचे ते सीईओ आहेत. त्याचबरोबर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानचे ते खजिनदार देखील आहेत. इतकंच नाही तर बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे ते अध्यक्ष देखील आहेत. याचबरोबर अनेक कंपन्यांवर ते संचालक म्हणून देखील काम पाहत आहेत.
वाचा >> Maharashtra cabinet expansion : भाजपच्या मंत्र्यांना मिळणार डच्चू? कारण…
शरद पवारांची युगेंद्र पवार यांनी भेट जरी वैयक्तिक कामासाठी घेतली असली, तरी त्यांच्या भेटीची वेळ मात्र खूप काही सांगून जाणारी होती. एकीकडे अजित पवार श्रीनिवास पवार यांच्या घरी असताना युगेंद्र हे शरद पवारांच्या भेटीसाठी आले होते. आता 2019 ला वडिलांनी शरद पवार आणि अजित पवारांमध्ये समेट घडवून आणली होती. आता राष्ट्रवादीच्या नव्या संघर्षात युगेंद्र मध्यस्ती करतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT