sharad pawar praful patel News In Marathi : प्रफुल्ल पटेलांनी अजित पवार गटाच्या मेळाव्यात शरद पवारांबद्दल आणि राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल महत्त्वाची विधाने केली. राष्ट्रवादी काँग्रेस २००४ मध्ये भाजपसोबत जाणार होती. त्याचबरोबर मी पुस्तक लिहिणार आहे, ज्यावर मालिका येऊ शकते, असे प्रफुल पटेल म्हणाले. पटेलांनी केलेल्या विधानांना उत्तर देताना शरद पवारांनी वर्मावरच बाण डागला.
ADVERTISEMENT
पुण्यातील पत्रकार परिषदेत शरद पवारांना असं विचारण्यात आलं की, प्रफुल पटेल म्हणाले आहेत की, ‘2004 सालीच आम्ही भाजपसोबत जाणार होतो.’ त्याला उत्तर देताना पवार म्हणाले, “2004 साली आम्ही जाणार होतो, असे ते जे म्हणाले; ते असत्य आहे असे मी म्हणणार नाही. आम्ही म्हणजे ते, मी नव्हे.”
हेही वाचा >> अजित पवार खोटं बोलताहेत का? शरद पवार म्हणाले, “फक्त एकच तक्रार…”
याच मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, “ही गोष्ट खरी आहे की, माझ्या घरी येऊ काही तास… निवडणुकीच्या थोडा आधीचा कालावधी होता. ते म्हणाले की, भाजपसोबत गेलो पाहिजे. अटलबिहार वाजपेयी यांच्याबरोबर गेलो पाहिजे. हा अत्यंत आग्रही विचार त्यांनी माझ्यासमोर मांडला. अनेक वेळा… तासन् तास ते सातत्याने सांगत होते. पण, ती गोष्ट स्वीकारणे शक्य नाही, मी सांगितले.”
शरद पवारांनी प्रफुल पटेलांना काय दिला होता सल्ला?
पटेलांसंदर्भात बोलताना पवार पुढे म्हणाले की, “एवढंच नव्हे तर तुम्हाला जायचे असेल, तर माझा काहीही गैरसमज होणार नाही. तुम्ही हा निर्णय घेऊ शकता, असा सल्ला मी त्यांना त्या ठिकाणी दिला. शेवटी माझा नकार बघितल्याच्यानंतर ते थांबले. ते थांबले आणि निवडणूक झाली. निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पराभव झाल्यानंतर पक्षाने त्यांना केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची जबाबदारी दिली. पराभूत उमेदवाराला सुद्धा पक्षाने केंद्रीय मंत्रिपद दिले, ही वस्तुस्थिती लक्षात घेण्याची गरज आहे”, असे सांगत पवारांनी पटेलांना अप्रत्यक्षपणे जागा दाखवली.
ईडीने किती मजले आणि का ताब्यात घेतले? पवारांचा सवाल
प्रफुल पटेल असं म्हणताहेत की मी पुस्तक लिहिलं तर त्याची एक मालिका निघेल, असं जेव्हा शरद पवारांना विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले की, “चांगली गोष्ट आहे. मी वाट बघतोय पुस्तकांची. त्यांच्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत. लोक पक्ष सोडून का जातात, यावर त्यांनी पुस्तकात एखादं चॅप्टर लिहावं. त्यांच्या घरामध्ये ईडीचे ऑफिस आले, त्यावर एखादं चॅप्टर लिहावं. दिल्लीत त्यांचं घर आहे, त्याचे किती मजले ईडीने ताब्यात घेतले आणि का घेतले, हे चॅप्टर लिहावं. आम्हा सगळ्यांच्या ज्ञानात भर पडेल”, असे म्हणत पवारांनी पटेलांच्या वर्मावरच बोट ठेवले.
ADVERTISEMENT