Sharad Pawar Reveals what did bjp give offer : “पंतप्रधानांनी शासकीय कार्यक्रमात राजकीय बोलू नये. पण, कार्यक्रम रेल्वेचा असतो आणि मोदींची गाडी विरोधकांच्या दिशेने धावते. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने शासकीय कार्यक्रमात राजकीय बोलू नये”, असा चिमटा काढत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला. याच भाषणात शरद पवारांनी अजित पवारांसोबत जाऊन मंत्री झालेल्या आठ नेत्यांबद्दल मोठा खुलासा केला.
ADVERTISEMENT
दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत बोलताना शरद पवारांनी भ्रष्टाचार, ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांवरून मोदींना घेरलं.
पवार म्हणाले, “पंतप्रधान (नरेंद्र मोदी) भोपाळमध्ये म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भ्रष्ट पार्टी आहे. जेव्हा राष्ट्रवादीची सत्ता होती, तेव्हा त्यांच्या मंत्र्यांनी भ्रष्टाचार केल्याचे सांगितले. आम्ही सांगितलं की, भ्रष्ट आहे, तर दाखवा. चौकशी करा. ज्यांनी चुकीचं काम केलं, त्यांच्याविरुद्ध कारवाई करा. शिक्षा असेल, तर शिक्षा द्या. याबद्दल त्यांची काहीही तयारी नाही. पण, ज्यांच्यावर आरोप केले होते, चार दिवसानंतर ते सगळे लोक राज्याच्या मंत्रिमंडळात सामावून घेतले”, अशा शब्दात शरद पवारांनी मोदींना लक्ष्य केलं.
अजित पवार गटाचे आठ मंत्री शरद पवारांना काय म्हणालेले?
यावेळी शरद पवारांनी अजित पवार गटातील आठ मंत्र्यांनाच कोंडीत पकडलं. हे नेते ईडीच्या कारवाईला घाबरून भाजपसोबत गेले, असं सांगताना पवारांनी पडद्यामागं घडलेला घटनाक्रम सांगितला.
हेही वाचा >> ‘…अन् एकनाथ शिंदे रडायला लागले’, आदित्य ठाकरेंनी कोणता किस्सा सांगितला?
पवार म्हणाले, “महाराष्ट्राबद्दल सांगायचं झालं, तर आठ लोकांना त्यांनी (भाजप) मंत्रिमंडळात सामावून घेतलं. मी स्पष्ट सांगू इच्छितो की, सर्व आठ लोक मला भेटायला आले होते, मंत्रिपदाची शपथ घेण्याच्या एक महिनाआधी. त्यांनी हे सांगितलं की, आमच्याविरुद्ध ईडीची कारवाई सुरु होत आहे. यातून मार्ग काढा.”
हेही वाचा >> शरद पवारांना झटका! निवडणूक आयोगातील सुनावणीआधीच एक खासदार झाला कमी
“ते म्हणाले की आम्हाला हे सांगितलं गेलं की तुम्ही आणि तुमची राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला पाठिंबा देण्यास तयार असतील, तुमच्याविरुद्ध काहीही होणार नाही. पण, तुम्ही आला नाहीत, तर तुमच्याविरुद्ध कारवाई होईल. त्यामुळे इकडे यायचं की तिकडे राहायचं, हे तुम्हाला ठरवायचं आहे. यात जे प्रामाणिक होते, जसे अनिल देशमुख. ते गृहमंत्री होते, त्यांना असं सांगितलं गेलं. त्यावेळी ते म्हणाले मी काहीही चुकीचं केलं नाही. तुम्ही मला अटक करू शकता. पण, मी पक्ष सोडणार नाही. त्यांना १३ महिने तुरुंगात ठेवलं”, असं सांगत शरद पवारांनी भाजपकडून काय ऑफर दिली गेली होती, याबद्दल खुलासा केला.
ADVERTISEMENT