Sharad Pawar : "मला संध्याकाळीच पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला असता"

मुंबई तक

19 May 2024 (अपडेटेड: 19 May 2024, 12:35 PM)

Sahrad Pawar News : पंतप्रधान होण्याची संधी असतानाही, ती का घेतली नाही, याबद्दल शरद पवार यांनी एका मुलाखतीत सविस्तर खुलासा केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार.

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार.

follow google news

बातम्या हायलाइट

point

शरद पवारांनी पंतप्रधान होण्याचं का टाळलं?

point

शरद पवार यांनी १९९६ बद्दल केला मोठा खुलासा

Sharad pawar Latest News : १९९६ मध्ये शरद पवार यांना पंतप्रधान होण्याची संधी होती. पण, त्यांनी खच खाल्ली, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल सातत्याने म्हणत आहेत. पटेलांच्या याच विधानाबद्दल अखेर शरद पवारांनी सविस्तर भूमिका मांडली. त्याचबरोबर मी जर पंतप्रधान पदाची शपथ घेतली असती, तर त्याच दिवशी संध्याकाळी मला पदाचा राजीनामा द्यावा लागला असता, असे पवार म्हणाले. पडद्यामागचे राजकारणाचा पवारांनी उलगडा केला. (Sharad Pawar said, I would have had to resign from the post of Prime Minister)

हे वाचलं का?

शरद पवार यांनी 'लोकसत्ता' वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यावेळी घडलेल्या राजकीय घडामोडींबद्दल खुलासा केला.

प्रफुल पटेल यांचं विधान अर्धसत्य -शरद पवार 

शरद पवार म्हणाले की, "एच. डी. देवेगौडा यांनी राजीनामा दिल्यावर मी पंतप्रधानपदाची संधी घालविली, असे विधान प्रफुल पटेल यांनी केले असले तरी हे विधान अर्धसत्य आहे. मी पंतप्रधानपद स्वीकारावे, अशी प्रफुल पटेल यांच्यासह काँग्रेसमधील अनेक नेत्यांची इच्छा होती."

हेही वाचा >>  'दुपार झाली, उठले असतील आणि सुपारी...', उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा!

"काँग्रेसच्या बहुसंख्य खासदारांचा मला पाठिंबा होता. कारण तेव्हा मी काँग्रेस पक्षाचा गटनेता होतो. पण वेगळं काही घडत असल्याचं माझ्या लक्षात आलं होतं. काँग्रेसमधील काही नेतेमंडळी माझ्या विरोधात होती", असे शरद पवार म्हणाले.

पाठिंबा काढून घेण्याचं कटकारस्थान, पवारांनी काय सांगितलं?

याच मुद्द्यावर बोलताना पवार पुढे म्हणाले की, "मी पंतप्रधानपदावर दावा करून हे पद मिळवलं असतं, तर शपथविधी झाला त्याच दिवशी सायंकाळी राजीनामा देण्याची वेळ माझ्यावर आली असती. कारण मी पंतप्रधानपदावर विराजमान झाल्यावर लगेचच पाठिंबा काढून घेण्याचं कटकारस्थान काही मंडळींनी केलं असतं."

"शेवटी पंतप्रधानपदाचा वेगळा सन्मान असतो. काहीही करून मला ते पद मिळवायचं आहे, असं माझं नव्हतं. मला त्या पदाची गरिमा घालवायची नव्हती. म्हणूनच मी आग्रह झाला तरी पंतप्रधानपद स्वीकारायचं नाही, असा निर्णय घेतला होता. पंतप्रधानपद मिळालं नाही याची अजिबात खंत नाही", असे भाष्य शरद पवार यांनी केले. 

"राजकारणात येणाऱ्या प्रत्येकाला हे पद मिळेल असं नसतं. मला तरुण वयात आमदारकी, मंत्रीपद मिळालं. मी माझ्या राजकीय कारकीर्दीबाबत समाधानी आहे", अशा भावना पवारांनी या प्रश्नाचं उत्तर देताना व्यक्त केल्या. 

    follow whatsapp