सत्तेच्या मागे जा, पण ज्यांच्याकडून आयुष्यात काही शिकला आहात, त्याच्याबंदल माणुसकी ठेवा, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना सुनावले आहे. बीडमधल्या जाहीर सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी मणिपूर हिसांचार, कळवा हॉस्पिटल मृत्यू प्रकरण यांसारख्या विषयावर भाष्य करून शिंदे-फडणवीस सरकार आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता.(sharad pawar criticize ajit pawaer devendra fadnavis pm narendra modi manipur voilence)
ADVERTISEMENT
आमच्यातला एक नेता तिकडे गेला, त्याने सांगितलं,पवार साहेबांच वय झालं, आता दुसरा नेता निवडावा लागेल, माझ वय झालं बघता, तुम्हीच काहीच बघितलं नाही,असा शब्दात शरद पवार यांनी अजित पवार गटावर हल्लाबोल केला आहे. तसेच सत्तेच्या मागे जायचंय तर जा,पण निदान ज्यांच्याकडून आयुष्यात तुम्ही काही शिकला असाल, त्यांच्यामुळे तुमचं बरं झालं असेल, त्यांच्याबद्दल थोडी माणुसकी ठेवण्याचा तरी प्रयत्न करा, अशा शब्दात शरद पवार यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.जनतेने भाजपचा पराभव केला आणि तुम्ही सत्तेत आलात.आज भाजपच्या दावणीला बसायची भूमिका त्यांनी त्यांची मांडली, पण जनतेला मतदान करण्याची संधी मिळेल तेव्हा कोणते बटण दाबायचं आणि तुम्हाला कुणाला कुठे पाठवायचं, हा निकाल लागल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच शरद पवार यांनी अजित पवार गटाला दिला आहे.
हे ही वाचा : Lok Sabha Election 2024: मोदीच येणार, पण…; नव्या सर्व्हेने भाजपचं वाढलं टेन्शन!
मोदी-फडणवीसांची उडवली खिल्ली
15 ऑगस्टच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन…असे शरद पवार यांनी उल्लेख करत नरेंद्र मोदींना सल्ला देत फडणवीसांचा किस्सा सांगितला. महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री होते, त्यांचे नाव देवेंद्र फडणवीस, त्यांनी सांगितलं होतं मी पुन्हा येईन, ते पुन्हा आले, पण खालच्या रँकवर. आता पंतप्रधानांना देवेंद्र फडणवीसांच्या सल्ला किंवा मार्गदर्शनाने पुन्हा यायचं असेल तर आज त्या पदाच्या खालती कुठे जायचंय, याचा विचार करून पुढलं पाऊल टाकावं, असा सल्ला शरद पवार यांनी देत खिल्ली उडवली होती.
शरद पवार यांनी मणिपूर हिंसाचारावरून देखील पंतप्रधान नरेंद्र मोदीवर निशाणा साधला आहे. पंतप्रधानांनी मणिपूरला जायची आवश्यकता होती. पण तिकडे त्यांनी ढुंकूनसुद्धा पाहिलं नाही. मणिपूरमधील भगिनींच दु:ख पंतप्रधानांनी एकूण घेतले नाही. संसदेत पंतप्रधान मोदी दोन तास बोलेल, पण मणिपूर हिंसाचारावर फक्त 3 मिनिटे बोलले असल्याची टीका शरद पवार यांनी केली.
ADVERTISEMENT