Keshav Upadhye : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आक्रोश मोर्चाच्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनातील महिला, पुरुष आणि युवकांवर लाठीहल्ला केल्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अंतरवाली सरटीत जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर शरद पवार यांच्यावर सत्ताधाऱ्यांनी आणि भाजपच्या नेत्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यावरुनच आता केशव उपाध्ये यांनीही शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. केशव उपाध्ये यांनी पवारांवर टीका करताना त्यांनी त्यांच्या आत्मचरित्राचा संदर्भ देत मराठा आरक्षणाविषयी शरद पवार यांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका त्यांनी केली आहे. लोक माझे सांगाती (Lok Majhe Sangati) हे आत्मचरित्र वाचल्यानंतर त्यांनी मराठा आरक्षणाविषयी नेहमीच दुटप्पी भूमिका घेतली असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
ही भूमिका दुटप्पी
केशव उपाध्ये यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांनी नेहमीच मराठा समाजावर अन्याय केला आहे. त्यांची भूमिका ही दुटप्पी कशी होती हे पाहायचे असेल तर त्यांनी लिहिलेले लोक माझे सांगातीमधून स्पष्ट दिसून येते अशा शब्दात त्यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
हे ही वाचा >> Maratha Morcha : उदयनराजेंनी उद्धव ठाकरेंच्या सरकारवरच फोडलं खापर, म्हणाले…
लोक माझे सांगाती
गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाचा कसा विकास होत नाही हेही त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात सांगितले आहे. याविषयीही त्यांनी लोक माझे सांगातीमध्ये स्पष्टपणे त्यांनी लिहिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
असंतोष वाढला
त्याच बरोबर मराठा आरक्षणाविषयी तीस ते चाळीस वर्षापासून असंतोष वाढत होता, मग मराठा सक्षमीकरणासाठी शरद पवारांनी काय प्रयत्न केले तर काहीच नाही असा ठपकाही त्यांनी त्यांच्यावर ठेवला आहे.
तरुणांना मोठी संधी प्राप्त
केशव उपाध्ये म्हणाले की, आरक्षण देण्यात थेट अडचणी होत्या असं शरद पवार यांनीच आपल्याच आत्मचरित्रात सांगितले आहे. मात्र त्यासाठी वेगळ्या पद्धतीने मार्ग का काढले नाहीत. ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी सारथीसारखे प्रयोग करुन त्यांनी मराठा समाजातील तरुणांना मोठी संधी प्राप्त करुन दिली, मात्र शरद पवार त्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत असा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
हे ही वाचा >> Eknath shinde : अजित पवार, देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला का होते गैरहजर?
चांगले वकील का नाहीत
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण मिळवलं आणि त्यांनी ते टिकवलंही होतं मात्र पुढील अडीच वर्षात मराठा आरक्षणासाठी चांगले वकील शरद पवार यांनी का दिले नाहीत असा सवालही केशव उपाध्ये यांनी केला आहे.
हे वादग्रस्त ठरु शकतं
मराठा आरक्षणाबाबत त्यांनी आता खुलासा केला पाहिजे. त्याच बरोबर आरक्षण देणं हे वादग्रस्त ठरु शकतं हे त्यांचेच विधान सध्याच्या काळात वादग्रस्त वाटू शकतं मात्र हे विधान त्यांच्याच पुस्तकात असल्याचेही त्यांनी सांगितले.
ADVERTISEMENT