छत्रपती संभाजीनगरची दंगल फडणवीसांनी घडवून आणली? शरद पवार म्हणाले…

योगेश पांडे

• 05:05 PM • 01 Apr 2023

छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगलीची घटना घडली. यात देवेंद्र फडणवीसांवर राजकीय वर्तुळातून आरोप करण्यात आले. यावर आता शरद पवारांनी भाष्य केले.

Sharad Pawar first reaction Chhatrapati Sambhaji Nagar violence

Sharad Pawar first reaction Chhatrapati Sambhaji Nagar violence

follow google news

छत्रपती संभाजीनगरमध्ये राम नवमीच्या आधी मध्यरात्री (30 मार्च) दोन गट आमने सामने येऊन दंगल घडली. शहरातील किराडपुरा भागात झालेल्या या हिंसाचाराच्या प्रकरणावरून जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले. याचसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी शरद पवारांनी राजकीय नेत्यांचे कान टोचत या घटनेवर भूमिका मांडली. (Sharad Pawar first reaction on Chhatrapati Sambhaji Nagar violence, say’s political leaders should speak responsibly)

हे वाचलं का?

नागपूरमध्ये शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी ‘महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेली दंगल देवेंद्र फडणवीसांनी घडवून आणली आहे, असाही आरोप झाला. त्यावर तुमचं भाष्य काय?’, असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला.

काही लोकांनी राजकीय मते व्यक्त केली -शरद पवार

त्यावर ते म्हणाले, “मी काही त्याच्या खोलात गेलो नाही. पण, महाराष्ट्रात अलिकडच्या काळात औरंगाबादला काही प्रकार घडला आणि मुंबईमध्ये मालवणी परिसरात एक प्रसंग घडला. या दोन्ही ठिकाणी त्याला एक प्रकारचे धार्मिक स्वरूप आहे की, काय अशी चिंता वाटण्याची स्थिती होती. त्याच्यामध्ये काही लोकांनी एकमेकांच्या संबंधी राजकीय मते व्यक्त केलेली आहेत, हे माझ्या वाचण्यात आले. पाहण्यात आले.”

Video : ‘मी आहे तोवर राम मंदिराला काही होऊ देणार नाही’, इम्तियाज जलील यांचा मंदिरातून मेसेज

“माझं स्पष्ट मत हे आहे की, या सगळ्या गोष्टींच्या संबंधी अधिक चर्चा करणे योग्य नाही. लवकरात लवकर पूर्वपरिस्थिती आता निर्माण झालेली आहे. ती स्थिती टिकेल कशी, हे बघितले पाहिजे”, अशी भूमिक शरद पवार यांनी यावेळी मांडली.

छत्रपती संभाजीनगर दंगल : शरद पवारांनी टोचले राजकीय नेत्यांचे कान

“हा धार्मिक अँगल असलेला प्रश्न राहणार नाही, राहणार याची खबरदारी सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या आमच्यासारख्या सगळ्यांनी घ्यावी. एकमेकांसंबंधीचे आरोप, टीका टिप्पणी करायची संधी अनेक वेळा असते, पण ज्यावेळी धार्मिक तेढ वाढेल अशी शक्यता असते. त्यावेळी जाणकारांनी काळजी घ्यावी असं माझे मत आहे”, असं म्हणत शरद पवारांनी भडक विधानं करणाऱ्या नेत्यांचे कानटोचले.

संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारवर काय केला होता आरोप?

“”महाराष्ट्रात विविध मार्गाने धार्मिक आणि जातीय तणाव वाढावेत, दंगली व्हाव्यात, अस्थिरता राहावी, असं काम हे सरकार करत आहे. हे त्यांचं राजकारण आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. आतातरी या सरकारचे डोके ठिकाणावर यावे. जनतेचे डोके ठिकाणावर आहे, सरकारचे डोके ठिकाणावर यावे.”

Video : “खैरे भडकावू बोलू नका, नाहीतर…”, चंद्रशेखर बावनकुळे का संतापले?

“या सरकारचा एकमेव हेतू आहे की, या राज्यात अशांतता निर्माण व्हावी. दंगली घडाव्यात. मूळात गृहमंत्री किंवा गृहमंत्रालय अस्तित्वात आहे की नाही, हाच प्रश्न आहे. मी वारंवार सांगतोय की, ते फडणवीस दिसत नाही. हे फडणवीस निराश आणि वैफल्यग्रस्त अवस्थेत काम करताना दिसत आहे. त्याची कारणे शोधावी लागतील आणि ती कारणे जाहीरपणे सांगण्यासारखी नाहीये. त्यांच्या चेहऱ्या नाराजी का आहे.”

“छत्रपती संभाजीनगरला जी परिस्थिती निर्माण झाली आहे, हे सरकारचे अपयश आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी अशा प्रकारचे वातावरण निर्माण व्हावं, ही या सरकारची इच्छा आहे आणि त्यासाठी मिंधे गटाच्या अनेक टोळ्या काम करत आहेत”, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला होता.

    follow whatsapp