Sharad pawar gets Angry : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक विधान केले. त्याच विधानाबद्दल एका पत्रकाराने शरद पवारांना प्रश्न विचारला. तो प्रश्न ऐकून शरद पवार चिडले. इतकंच नाही, तर त्यांनी थोडी अक्कल तर वापरा, अशा शब्दात पत्रकाराला सुनावलं. बारामती येथे झालेल्या पत्रकार परिषदेत हे घडलं. तो प्रश्न काय होता आणि पवारांनी काय म्हटलंय?
ADVERTISEMENT
कोल्हापूरला रवाना होण्यापूर्वी शरद पवारांनी बारामतीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार हे भाजपसोबत येतील असे विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे, असा प्रश्न एका पत्रकाराने शरद पवारांना विचारला.
हेही वाचा >> “उद्धव ठाकरे, संजय राऊत यांचे अश्रू थांबले नाहीत, त्यामुळे आज…”, भाजपने डिवचलं
हा प्रश्न ऐकून शरद पवार चिडले. त्यांनी मध्येच पत्रकाराला थांबवले. पुढे ते म्हणाले, “काहीही प्रश्न काय विचारता? थोडी अक्कल तर वापरा”, असे म्हणत पवारांनी पत्रकाराला सुनावलं.
अजित पवार आमचे नेते -शरद पवार
‘सुप्रिया सुळे असे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही. अजित पवार आमचेच नेते आहेत’, असा मुद्दा एका पत्रकाराने उपस्थित केला.
हेही वाचा >> ‘118 जागा लढल्यावर…’, दिलीप वळसे पाटलांना सुप्रिया सुळेंनी घेरलं
त्यावर शरद पवार म्हणाले की, “मग आहेच ना. यामध्ये वादच नाही. फूट पडणं याचा अर्थ काय… पक्षात फूट कधी होते, जर पक्षातच एक मोठा गट वेगळा झाला देशपातळीवर.. आज तशी स्थिती इथे नाही. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. तर लोकशाहीमध्ये तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी निर्णय घेतला म्हणून फूट पडण्याचं कारण नाही. तो त्यांचा निर्णय आहे”, अशी भूमिका शरद पवारांनी मांडली.
चंद्रशेखर बावनकुळे शरद पवारांबद्दल काय बोलले होते?
भाजपच्या जनसंवाद यात्रेनिमित्त चंद्रशेखर बावनकुळे हे वाशिममध्ये होते. यावेळी ते म्हणाले होते की, “अजित पवार यांनी जसं स्पष्ट केलं की या देशाला पुढं नेण्याचं कार्य एकमेव मोदी करू शकतात ही जर भूमिका सुप्रिया सुळे यांच्याककडे असेल तर राष्ट्रवादी पूर्ण लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत आमच्या सोबत असेल तर आनंदच आहे.”
“शरद पवार यांना आज ना उद्या वाटेलच मोदी या देशाला जगातला सर्वोत्तम देश करण्याची क्षमता ठेवतात. त्यामुळे कालांतराने का होईना मला विश्वास आहे शरद पवार मोदींच्या नेतृत्वातील भारत निर्माण करण्यासाठी मदत करतील. शरद पवार यांना मोदींचा विकास त्यांना कळतो, तेही प्रगल्भ नेते आहेत. त्यामुळे इंडिया नाव तयार करून जी मोट बांधली गेलीये, त्यात काही दम नाही. देशाला स्थैर्य देण्यासाठी पंतप्रधान मोदी पाहिजेत. त्यांचं आज ना उद्या मन परिवर्तन होईल”, असं बावनकुळे म्हणाले होते.
ADVERTISEMENT