NCP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा दिलासा, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

मुंबई तक

08 Jul 2024 (अपडेटेड: 08 Jul 2024, 07:48 PM)

sharad pawar ncp : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आणि चिन्हाला अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे कलम 29 बी नुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आता देणगी स्विकारता येणार नाहे.

sharad pawar ncp big relief  sharad pawar party and symbol tutari election commision of india

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा

follow google news

बातम्या हायलाइट

point

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा

point

शरद पवारांच्या पक्षाला आणि चिन्हाला अधिकृत मान्यता

point

शरदचंद्र पवार पक्षाला आता देणगी स्विकारता येणार

Sharad Pawar Ncp, Election Commision of India :राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आणि चिन्हाला अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे कलम 29 बी नुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आता देणगी स्विकारता येणार नाहे. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा दिलासा मिळाला आहे.  (sharad pawar ncp big relief  sharad pawar party and symbol tutari election commision of india) 

हे वाचलं का?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हाबाबत आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली होती. या सुनावणीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा तात्पुरत्या स्वरूपात देण्यात येणारे तुतारी चिन्ह आता यापूढेही कायम राहणार आहे. त्यामुळे कलम 29 बी नुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आता देणगी स्विकारता येणार नाहे.

हे ही वाचा : Worli Accident : मिहीरने BMW वांद्र्यात सोडली अन् रिक्षाने... वाचा Inside Story

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? 

निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आलेल्या निर्णयानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला तुतारी हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलं होतं, पण आम्हाला देणगी स्वरुपात रक्कम घेण्याचा अधिकार दिलेला नव्हता तसेच कर लाभ देखील मिळत नव्हते. आता आमची विनंती निवडणूक आयोगाने मान्य केली आहे.

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्ही निवडणूक आयोगाकडे दुसरी एक विनंती केली. यामध्ये तुतारी चिन्हावरून होणाऱ्या संभ्रमावस्थेबद्दल होती. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी दुसरी तुतारी देण्यात येऊ नये, अशी विनंती केली असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. असा अन्याय इतर कोणत्याही पक्षावर होऊ नये, असेही त्या म्हणाल्या आहेत. 

जितेंद्र आव्हाडांचं ट्विट जशाचं तसं...

महाराष्ट्रातील फाटाफुटीनंतर अपात्रतेची लढाई  सुरूच आहे. अजित पवार गटाच्या आमदारांना अपात्र करण्यासंदर्भातील आमची याचिका मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल आहे. आज आमच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश श्री. चंद्रचूड यांच्यासमोर आपले म्हणणे मांडले. हे म्हणणे ऐकल्यानंतर, "२३ तारखेला याबाबत सुनावणी लावून घ्यावे; मी स्वतः हे मॅटर ऐकणार आहे. " म्हणजेच महाराष्ट्रातील गद्दारी लोकांसमोर आली पाहिजे अन् त्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे, यासाठी आमचा हा लढा सुरू आहे. कारण, महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीचा हा भाग असून आपले संस्कार आणि संस्कृती वाचविली पाहिजे. 

हे ही वाचा : Raigad Fort: शिवभक्तांसाठी बॅड न्यूज... रायगड आजपासून पर्यटकांसाठी बंद!

चार नंबर कोर्टामध्ये न्यायाधीश सुर्यकांतजींसमोर १६ व्या क्रमांकावर नागालॅंडच्या आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवरील सुनावणी लागली होती. या याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकून दोन मिनिटात नोटीस काढण्याचे आदेश दिले, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. याच प्रकरणात त्यांना महाराष्ट्रासंबधात सांगितल्यानंतर त्यांनी शांतपणे ऐकून घेतले. आम्ही त्यांना सांगितले की, ३ एप्रिलपर्यंत अजित पवार गटाला आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश आपण दिले होते. मात्र, अजित पवार गटाने आजपर्यंत आपले म्हणणे मांडलेले नाही. ही बाब ऐकल्यानंतर, " हे प्रकरणही १६ तारखेच्या कामकाजात घ्या; हे मॅटरही मी ऐकणार आहे." आता आनंदाची गोष्ट ही आहे की, तिन्ही याचिकेंसंदर्भात, नागालॅंड एक आणि महाराष्ट्रातील दोन या याचिका न्यायालयासमोर आहेत. त्याच्या तारखा लागलेल्या आहेत. त्यामुळेच आता आम्हाला अपेक्षा आहे की, येत्या एक दीड महिन्यात या सर्व याचिकांवरील सुनावणी संपलेली असेल अन् महाराष्ट्राला न्याय मिळेल.  या याचिकेंसंदर्भात आदरणीय शरद पवार साहेब अत्यंत गंभीर असून त्यांनी सर्वांशी गांभीर्यपूर्वक चर्चा करून या याचिका अत्यंत ताकदीने लढण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्ष चिन्ह कोणाचं यावर आता येत्या 16 जुलैला सुनावणी पार पडणार आहे. हा निकाल आता कुणाच्या बाजूने लागतो. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यासह नागालँडमधील आमदार अपात्रतेचा विषयही सुनावणीसाठी घेतला जाणार आहे.अभिषेक मनुसंघवी यांनी आज सरन्याधीशांसमोर ही याचिका नमुद केली असता सरन्याधीशांनी आमदार अपात्रतेच्या विषयावरची सुनावणी 23 जुलैला ठेवली आहे.

    follow whatsapp