Sharad Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून (NCP) बंड करून सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले. ज्या काकांनी त्यांना राजकारणात आणले त्यांच्याबरोबरच दोन हात करत पक्ष आणि चिन्हही त्यांनी त्यांच्याकडून काढून घेण्यात आले. त्यानंतर अजित पवारांनी वारंवार शरद पवारांच्या वयाचा विषय काढून त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी पुन्हा एकदा आपल्या शैलीत वयाचा दाखला देत वय झालं म्हणून काय झालं असा सवाल उपस्थित करून तुम्ही माझ्या वयाची चिंता करू नका असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे.
ADVERTISEMENT
वय झालं म्हणून काय झालं
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या वयाचा संदर्भ देत अजित पवार आणि त्यांच्या गटाकडून त्यांच्यावर टीका केली जाते. त्यावर शरद पवार यांनीच उत्तर दिले आहे. यावेळी ते म्हणाले की, 'काही लोक माझं वय झालं असं सांगतात. मात्र वय झालं हे ठिक आहे मग वय झालं म्हणून काय झालं असा प्रतिसवालही त्यांनी केला आहे.
वयाची चिंता करू नका
माझ्या वयाची वगैरे चिंता तुम्ही करू नका. कारण याही परिस्थितीत आपण मात करू शकतो. याआधीही अनेक लोकं आम्ही पाहिले आहेत. या देशामध्ये वयाच्या 85 व्या वर्षी मोराराजी देसाई देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यांनीही देश चालवला.त्यामुळे मोरारजी देसाई यांच्यासारख्या नेत्यांची अनेक नावं सांगता येतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
विचारधारा भक्कम हवी
यावेळी शरद पवार यांनी सांगितले की, 'मनस्थिती आणि विचारधारा भक्कम असली तर वय कधी आडवं येत नाही. त्यामुळे मी निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात जाऊन महाराष्ट्रातील नव्या पिढीला सोबत घेऊन नवीन पिढीचं नवीन नेतृत्व महाराष्ट्रात तयार करण्याचे नियोजन असल्याचंही त्यांनी सांगितले.
नवी पिढीला संधी देऊ
शरद पवार यांनी सांगितलं की, '1967 साली मी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेला उभा राहिलो. त्यावेळी नव्या पिढीला राजकारणात संधी देण्यात आली. त्याप्रमाणे नव्या पिढीचं नेतृत्व शोध घेऊ, त्यांना शक्ती देऊ, संधी देऊ आणि अधिकार देऊ व महाराष्ट्राचा चेहरा नवी पिढी बदलू शकते आणि इतिहास निर्माण करू शकते असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
ADVERTISEMENT