Uddhav Thackeray Criticized Eknath Shinde: मुंबई: महाराष्ट्रात सध्या अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याच मुद्द्यावरुन शिवसेना (UBT) चे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे सरकारवर आगपाखड केली आहे. ‘एकीकडे राज्यात शेतकऱ्यांची वाताहात झालेली असताना दुसरीकडे मुख्यमंत्री मात्र दुसऱ्या राज्याता प्रचाराला जातात.. लाज वाटत नाही?’ अशा शब्दात ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (CM Eknath Shinde) निशाणा साधला. ‘मातोश्री’वर बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. (shiv sena thackeray vs shinde you go there to election campaign dont you feel ashamed uddhav thackeray venomous attack on cm eknath shinde)
ADVERTISEMENT
पाहा उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले…
‘सूरत, गुवाहटी, गोवा हा चोरटेपणाचा जो व्यवहार लोकांना सांगणार का?’
‘जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत ते आपलं घर सोडून इतरांची घरं धुडाळत आहेत. आज सुद्धा मुख्यमंत्री कुठे आहेत? माझ्या माहितीप्रमाणे ते तेलंगणाला गेले आहेत. तेलंगणाला जाऊन काय प्रचार करणार? कोणत्या भाषेत बोलणार? काय ते सूरत, गुवाहटी, गोवा हा चोरटेपणाचा जो व्यवहार आहे तो तिथल्या लोकांना सांगणार आहेत का..’
‘स्वत:चं घर न सांभाळता दुसऱ्याच्या घरात डोकावणारे भुरटे हे राज्याला न्याय देऊ शकत नाही. राज्य असंच वाऱ्यावर आहे. एक फुल दोन हाफ.. दुसरे दोन हाफ कुठे आहेत त्याची काहीच कल्पना नाही. शेवटी या राज्याचा मायबाप कोण आहे?’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी जोरदार हल्ला चढवला.
खुर्ची सांभाळण्यासाठी दिल्ली वाऱ्या..’
‘साधारण काही दिवसांपूर्वी हवामान खात्याने इशारा दिला होता की, या काळात अवकाळी पाऊस, गारपीठ होऊ शकते. काय केलं मंत्रिमंडळाने, काय केलं मुख्यमंत्र्यांनी..?’
हे ही वाचा>> Lok Sabha 2024 : ईशान्य मुंबईतून ठाकरेंचा उमेदवार ठरला! कोण आहेत संजय पाटील?
‘हे पूर्णपणे स्वत:ची खुर्ची सांभाळण्यासाठी जेवढ्या दिल्ली वाऱ्या करतायेत.. त्यावर काही बोलल्यावर मुख्यमंत्री.. गद्दार लगेच गळा काढतात की, गरीब शेतकऱ्याचा मुलगा..’
‘तुमच्या शेतीचा आदर आहे.. पण तुमची पंचतारांकित शेती.. ज्या शेतीमध्ये हे हेलिकॉप्टरने जातात.. मी तर म्हणतो अशी शेती माझ्या साध्या शेतकऱ्यांनाही लाभो.. इतर कोणाचीही अशी शेती नाही..’ अशा चिमटाही ठाकरेंनी यावेळी काढला.
‘पंतप्रधान, मुख्यमंत्री, गृहमंत्री दमदाट्या करतात..’
‘पंतप्रधान हे क्रिकेटच्या फायनलला जातात पण मणिपूरला जात नाही. पण आपले पंतप्रधान, मुख्यमंत्री, गृहमंत्री त्यांना दमदाट्या करायला, इतर राज्यात प्रचार करायला वेळ आहे. पण माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या पाठीवर हात फिरवायला ते कधी येणार?’
हे ही वाचा>> MNS : राज ठाकरे CM शिंदेंवर भडकले; म्हणाले, “नुसतं बोलायचं बाळासाहेबांचे विचार,पण…”
‘मुख्यमंत्री स्वत:चं घर सोडून दुसऱ्याच्या दारी फिरतायेत. अरे कोणाच्या दारी जातायेत तुम्ही? त्या राज्याला काय मुख्यमंत्री नाहीत? स्वत: पंतप्रधान म्हणजे विश्वगुरू आल्यानंतर तुम्ही तिकडे जाऊन काय दिवे लावणार आहात? तुम्ही स्वत:चं राज्य कधी सांभाळणार आहात?’ असा खडा सवालही उद्धव ठाकरेंनी यावेळी विचारला.
‘धनंजय मुंडे शेतकऱ्यांवर दया दाखवा म्हणतोय… करूणा दाखवा असं म्हणत नाही..’
‘आजच एक बातमी आली आहे की, कृषीमंत्र्यांनी जाहीर केलं आहे की, आम्ही वस्तूनिष्ठ… आता कोणती वस्तू आणि तुमची निष्ठा कोणाशी ते सांगा.. ज्याची निष्ठाच कोणावर नाही तो वस्तूनिष्ठ माहिती घेऊन काय जाहीर करणार? त्यामुळे मी या शेतकऱ्यावर दया दाखवा म्हणतोय… करूणा दाखवा असं म्हणत नाही..’ अशी कोपरखळीही ठाकरेंनी लगावली आहे.
‘तिकडे प्रचाराला जाता.. लाज नाही वाटत?’
‘आपलं घरदार वाऱ्यावर सोडून दुसऱ्यांच्या घरात प्रचाराला जात असतील तर या मुख्यमंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्र्यांचा उपयोग काय राज्याला..?’
‘आज कुठे तेलंगणात गेले आहेत… महाराष्ट्र उघडा पडलाय, शेतकऱ्यांची वाताहत झाली आहे आणि तुम्ही तिकडे प्रचाराला जाता.. लाज नाही वाटत? मग हे बोलल्यावर पुन्हा स्वत:च्या पंचतारांकित शेतीतून बोलणार गरीब शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला…’ अशा शब्दात ठाकरेंनी शिंदेंवर टीका केली.
ADVERTISEMENT