2018 video of Eknath Shinde lying on stage at Uddhav Thackeray feet: मुंबई: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेना पक्ष आणि व्हीपबाबत दिलेल्या निर्णयानंतर आज (16 जानेवारी) शिवसेना (UBT)यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत जोरदार हल्ला चढवला. पण त्याआधी शिवसेना UBT पक्षाने नार्वेकरांनी दिलेल्या निकाल चुकीचा असल्याचा दावा करत थेट काही व्हिडीओच दाखवले. त्यातील एक व्हिडीओ हा 2018 साली उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची नेते म्हणून निवड केल्याचा होता. ज्यानंतर एकनाथ शिंदे हे स्टेजवर जाऊन ठाकरेंच्या पाया पडत असल्याचं पाहायला मिळालं. (shiv sena ubt criticizes rahul narvekar and chief minister shinde by showing 2018 video of eknath shinde lying on stage at uddhav thackerays feet)
ADVERTISEMENT
नेमकं प्रकरण काय?
राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालात फक्त शिवसेनेची 1999 सालची घटना लक्षात घेतली होती. त्यांनी 2013 आणि 2018 सालची पक्षाची घटना विचारात घेण्यास नकार देत आपला निकाल दिला. जो एकनाथ शिंदेच्या बाजूने लागला. याच निर्णयाविरोध ठाकरे हे सुप्रीम कोर्टात देखील गेले आहेत. मात्र, आपली बाजू जनतेसोबत आणण्यासाठी त्यांनी महापत्रकार परिषदेचं आयोजन केलं. ज्यामध्ये त्यांनी 2013 आणि 2018 मधील निवडणुकीचं फुटेजच सगळ्यांना दाखवलं.
नेते म्हणून निवड अन् एकनाथ शिंदे पडलेले उद्धव ठाकरेंच्या पाया..
23 जानेवारी 2018 साली राष्ट्रीय कार्यकारणीची निवड करताना उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची नेते म्हणून निवड केली होती. त्याचाच व्हिडिओ आजच्या पत्रकार परिषदेत दाखविण्यात आला. पाहा त्यावेळी नेमकं स्टेजवर काय झालेलं…
सर्वप्रथम शिवसेना नेते, राष्ट्रीय कार्यकारिणी ही 13 सदस्यांची आहे. शिवसेना पक्षप्रमुख हे यामध्ये कोणतेही बदल, नियुक्ती करत असतात. हा त्यांचा निर्णय आहे. तो शिवसेनेत सर्वांन मान्य आहे. आज ज्या नेत्यांची निवड पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली त्यामध्ये शिवसेना नेते म्हणून एकनाथ शिंदे यांना निवडण्यात आलं आहे.
हे ही वाचा>> Uddhav : ठाकरेंचा ‘लाव रे तो व्हिडिओ’, पत्रकार परिषदेत काय केला महाखुलासा?
शिवसेनेचे नेते म्हणून चंद्रकांत खैरे यांचीही निवड झाली आहे. शिवसेनेचे नेते म्हणून अनंत गीते यांचीही निवड झाली आहे. शिवसेनेचे नेते म्हणून आनंदराव अडसूळ यांचीही निवड झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुखांनी या चारही नेत्यांची नावं जाहीर केली आहेत. अशी घोषणा त्यावेळी अनिल देसाई यांनी केली होती.
याच घोषणेनंतर हे चारही नेते हे उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मंचावर गेले होते. जिथे सुरुवातीला चंद्रकांत खैरे यांनी उद्धव ठाकरेंना नमस्कार केला. तर त्यानंतर एकनाथ शिंदेंनीही ठाकरेंना नमस्कार केला.
हाच व्हिडीओ आजच्या पत्रकार परिषदेत दाखवून ठाकरे गटाकडून नेमका शिवसेना पक्ष कोणाचा, शिवसेना पक्षाची निवडणूक, राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड या सगळ्याबाबत खुलासा करण्यात आला.
हे ही वाचा>> Shiv Sena UBT: ‘त्या’ Video नंतर उद्धव ठाकरे प्रचंड संतापले, नार्वेकर-शिंदेंना म्हणाले; ‘तुम्ही…’
उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख झालेली निवड त्याला दिलेलं अनुमोदन या सगळ्या गोष्टींचे व्हिडीओ हे आज समोर आणण्यात आले. जेणेकरून नार्वेकरांनी दिलेला निकाल हा अन्यायकारक आहे. असा दावा ठाकरे गटाकडून यावेळी करण्यात आला.
सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दावोस दौऱ्यावर आहेत. अशावेळी हे व्हिडीओ दाखवून ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंच्या एकूणच राजकीय खेळीबाबत काही सवाल उपस्थित केले आहेत. ज्याला आता एकनाथ शिंदे हे नेमकं कसं उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT