Sudhir Salvi: लालबागच्या राजाचे सचिव आमदार होणार?, कोणी केला राजाला नवस.. ती चिठ्ठी तुफान चर्चेत

मुंबई तक

17 Sep 2024 (अपडेटेड: 17 Sep 2024, 06:50 PM)

Sudhir Salvi Letter To Lalbaugcha Raja : सर्वांचा लाडका बाप्पा लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा मुंबईत मोठ्या दिमाखात पार पडत आहे. गणेशोत्सवाची धामधूम सुरु असतानाच राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे.

Sudhir Salvi Viral Letter

Lalbaugcha Raja Latest News

follow google news

बातम्या हायलाइट

point

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यासाठी लालबागच्या चरणी साकडं

point

'या' नेत्याला आमदार करण्यासाठी समर्थकांनी लिहिली लालबागच्या राजाच्या चरणी

point

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा

Sudhir Salvi Letter To Lalbaugcha Raja : सर्वांचा लाडका बाप्पा लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा मुंबईत मोठ्या दिमाखात पार पडत आहे. गणेशोत्सवाची धामधूम सुरु असतानाच राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळवण्यासाठी अनेक नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु असल्याच्या चर्चा आहेत. अशातच आता ठाकरे गटाचे कार्यकर्ते सुधीर साळवी शिवडी विधानसभेसाठी इच्छूक असल्याचं एका व्हायरल चिठ्ठीच्या माध्यमातून समोर आलं आहे.

हे वाचलं का?

साळवी यांच्या कार्यकर्त्यांनी लालबागच्या चरणी एक चिठ्ठी अर्पण केली आहे. या चिठ्ठीची राजकीय वर्तुळात तुफान चर्चा सुरु आहे. शिवडी विधानसभेतून ठाकरे गटाचे नेते सुधीर साळवी विधानसभेसाठी इच्छूक आहेत. सुधीर साळवी लागबागच्या राजाचे मानद सचीवही आहेत. शिवडीत ठाकरे गटाचे अजय चौधरी हे आमदार आहेत. 

हे ही वाचा >>Viral Video : ओढणी हातात घेऊन रिल बनवत होती, पाय घसरला अन् दरीत पडली, घटनेचा थरार पाहा जसाच्या तसा

चिठ्ठीत काय लिहिलं आहे?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), शिवडी विधानसभा 2024, आमदार  सुधीर (भाऊ) साळवी, असा उल्लेख या चिठ्ठीत करण्यात आला आहे. ही चिठ्ठी लालबागच्या चरणी अर्पण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिवडीत ठाकरे गटाचे अजय चौधरी हे आमदारा आहेत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून कोणत्या नेत्याला तिकिट मिळते? सुधीर साळवी की अजय चौधरी? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे.

हे ही वाचा >> Viral Video: गणपतीच्या सोंडेजवळ अचानक आला जिवंत साप अन् पुढे जे घडलं...

सुधीर साळवी शिवसेना ठाकरे गटाचे अनुभवी नेते आहेत. साळवी यांनी शिवडी विधानसभा संघटक, दक्षिण मुंबई लोकसभा समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. विशेष म्हणजे ते लालबागच्या राजा मंडळाचे मानद सदस्य आहेत. विधानसभा निवडणुका तोंडावर असतानाच सुधीर साळवी यांच्या नावाची चिठ्ठई व्हायरल झाली आहे. त्यामुळे साळवी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक असल्याचं संकेत या चिठ्ठीच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.

    follow whatsapp