Hathras stampede: बाबाचा सत्संग बेतला जीवावर, 100 हून अधिक लोकांचा एका झटक्यात मृत्यू!

मुंबई तक

• 09:34 PM • 02 Jul 2024

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एका सत्संगाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाल्याने 100 हून अधिक जाणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

100 हून अधिक लोकांचा एका झटक्यात मृत्यू!

100 हून अधिक लोकांचा एका झटक्यात मृत्यू!

follow google news

Hathras Satsang stampede:  हाथरस (उ. प्रदेशः): संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी एक घटना ही उत्तर प्रदेशातील हाथरस येथील रतिभानपूर येथे घडली आहे. येथे भोले बाबाच्या सत्संगात प्रचंड चेंगराचेंगरी झाली.  ज्यामध्ये तब्बल 107 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत आतापर्यंत 107 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती अलीगढच्या आयुक्तांनी दिली आहे. तसेच यामध्ये 18 लोक जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचा अधिक समावेश आहे. (stampede in bhole baba satsang more than 100 people died cm yogi will go to hathras tomorrow)

हे वाचलं का?

या दुर्घटनेची गंभीर दखल घेत उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाने जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्याचे आणि घटनास्थळी मदतकार्याला गती देण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. एडीजी आग्रा आणि आयुक्त अलीगढ यांच्या नेतृत्वाखाली घटनेच्या कारणांचा तपास करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. सीएम योगींच्या सूचनेनंतर सरकारचे दोन वरिष्ठ मंत्री आणि डीजीपीसह मुख्य सचिवही घटनास्थळी रवाना झाले.

सीएम योगी बुधवारी जाणार हाथरसला

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे उद्या बुधवारी हाथरसला जाऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. जिथे मुख्यमंत्री पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत प्रधान सचिव संजय प्रसादही उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, मुख्य सचिव आणि डीजीपी आज हाथरसमध्ये राहणार असून उद्या मुख्यमंत्री तेथे पोहोचल्यावर त्यांचा निरीक्षण अहवाल देतील. तसेच उद्या स्वतः एडीजी आग्रा झोन आणि अलिगढ विभागाचे आयुक्त यांना त्यांचा अधिकृत अहवाल सादर करायचा आहे.

ही आहे हेल्पलाइन

या घटनेची परिस्थिती लक्षात घेऊन हाथरसच्या जिल्हा प्रशासनाने सर्वसामान्यांच्या मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक 05722227041 आणि 05722227042 जारी केले आहेत.

हाथरसचे डीएम आशिष कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत सुमारे लोकांचा मृत्यू झाला. हा एक खाजगी कार्यक्रम होता, ज्यासाठी आयोजकांनी एसडीएमची परवानगी घेतली होती.

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडली : आयोजक

सत्संगाच्या आयोजन समितीशी संबंधित महेश चंद्र यांनी 'आज तक'शी फोनवरील संभाषणात सांगितले की, 'आम्ही जिल्हा प्रशासनाची परवानगी घेऊन कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाला एक लाखाहून अधिक भाविक उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यावर चेंगराचेंगरी झाली. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडली. कार्यक्रम आटोपल्यानंतर लोक चिखलात एकामागून एक पडत राहिले, त्यांच्या मदतीला कोणीच नव्हते. मी भंडाऱ्याचे काम पाहत होतो.'

'हा कार्यक्रम 13 वर्षांनंतर हाथरसमध्ये झाला. आम्हाला 3 तासांची परवानगी होती. दुपारी दीड वाजता कार्यक्रम संपल्यानंतर ही घटना घडली. कार्यक्रमाला असंख्य भाविक हजर राहतील अशी माहिती प्रशासनाला आधीच देण्यात आली होती. या कार्यक्रमला प्रचंड गर्दी होती. या कार्यक्रमात 12 ते साडेबारा हजार सेवक होते. आम्ही अनेक पातळ्यांवर पूर्ण व्यवस्था केली होती. पण तिथे रुग्णवाहिका नव्हती. कार्यक्रम संपल्यावर येथील लोकं अचानक एकत्र पळू लागले आणि चेंगराचेंगरी झाली. त्यातच पावसाळ्यात चिखलामुळे लोक एकमेकांवर पडू लागले.'

मृतदेहांची ओळख पटली : पोलीस

एसएसपी राजेश कुमार सिंह यांनी सांगितले की, 'हाथरस जिल्ह्यातील मुगलगढ़ी गावात धार्मिक कार्यक्रम सुरू असताना चेंगराचेंगरी झाली. अनेक लोकांचे मृतदेह एटाह रुग्णालयात पोहोचले आहेत, ज्यात महिला, मुले आणि व्यक्तींचा समावेश आहे. अद्याप एकही जखमी रुग्णालयात पोहोचला नाही. या सर्व मृतदेहांची ओळख पटवली जात आहे. या घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी एडीजी आग्रा आणि अलिगढ आयुक्तांचे एक पथक तयार करण्यात आले आहे.'

मुख्यमंत्र्यांनी दिले घटनेची चौकशीचे आदेश

या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयाने जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तातडीने जखमींना योग्य उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचे आणि घटनास्थळी मदतकार्याला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. एडीजी आग्रा आणि आयुक्त अलीगड यांच्या नेतृत्वाखाली घटनेच्या कारणांचा तपास करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

सत्संगानंतर चेंगराचेंगरी झाली : पीडित

एका महिलेने सांगितले की, 'आम्ही दर्शनासाठी आलो होतो. खूप गर्दी होती. चेंगराचेंगरी झाली तेव्हा मी आणि माझा मुलगाही गर्दीत खाली पडलो.' जखमी आईसोबत रुग्णालयात पोहोचलेल्या एका मुलीने सांगितले की, 'सत्संग संपल्यानंतर चेंगराचेंगरी झाली. आम्ही शेतातून निघालो होतो, तेवढ्यात अचानक जमावाने ढकलायला सुरुवात केली, त्यामुळे बरेच लोक खाली चिरडले गेले. आमच्यासोबत आणखी एक व्यक्ती आली होती. जिचा मृत्यू झाला आहे.'

    follow whatsapp