मुंबई: ‘सत्तासंघर्षाच्या निकालात सुप्रीम कोर्टाने पाचर मारली आहे.’ असं म्हणत प्रा. सुहास पळशीकर यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर मुंबई Tak ला सडेतोड मुलाखत दिली आहे. मोदींचा करिष्मा,सत्तासंघर्षाचा निकाल,लोकसभेचं मैदान कोण मारणार? यावर मुंबई तकचे संपादक साहिल जोशी यांनी सेंटर फॉर पॉलिटीकल स्टडीजचे संपादक आणि लोकनितीचे सहसंपादक प्रा.सुहास पळशीकर यांची घेतलेली Exclusive मुलाखत.
ADVERTISEMENT
पाहा सुहास पळशीकर यांची संपूर्ण मुलाखत
सुहास पळशीकर यांच्या मुलाखतीमधील महत्त्वाचे मुद्दे:
– उद्धव ठाकरेंचे सरकार आणणे सुप्रीम कोर्टाला कठीण होते
– हे सरकार बेकायदेशीररीत्या आले आहे या निर्णयातून स्पष्ट होते
– पक्षांतरबंदी कायदा गोंधळाचा आहे
– मधू लिमये म्हणाले होते पक्षांतरबंदी कायदा निरुपयोगी
– सुप्रीम कोर्टापुढे निर्णय घेताना खूप मोठा पेच होता
– इथून पुढे सभापती नी निर्णय घेताना विचार करावा लागणार आहे
– हा निर्णय संतुलन राखण्याचा सुप्रीम कोर्टाने प्रयत्न केलाय
– सुप्रीम कोर्ट कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय देते राजकिय उलथापालथमध्ये सुप्रीम कोर्ट कायद्यात काय बसते इतकेच पाहू शकते
– सुप्रीम कोर्टाची या निर्णयात खूप कसरत झालेली आहे
– निवडणूक आयोगाने घाईघाईने निर्णय दिला
– दोन्ही यंत्रणा गडबडीने निर्णय घेत आहेत आणि सुप्रीम कोर्ट हताशपणे पाहते आहे
– पक्षांतरबंदी कायदा विचित्र परिस्थीत झाला आहे
– पक्षांतरबंदी कायद्याच्या शेकडो केसमध्ये निर्णयात हाती काही लागलेले नाही
– हा कायदाच मुळी निरुपयोगी आहे
– मतदार पक्षांतरबंदीवर नैतिकवादी भूमिका अजिबात घेत नाही
– मतदारांवर ह्याचा फरक पडत नाही कर्नाटकात असे ६ आमदार निवडून आले
– सभापतीनी काय करायचे हे सांगितले आहे पण ते सभापतीनी ठरवायचे आहे असे सुप्रीम कोर्टाने फार विचित्र म्हटले आहे
– नार्वेकरांचा व्हिपचा निर्णय नियमाला धरून नाही
– हा सुप्रीम कोर्टाने फार चतुराईने केलेली रचना आहे
– सभापती जेव्हा निर्णय घेतील तेव्हा रण माजणार आहे
– जून मध्ये कोणता पक्ष खरा होता हे सभापतीना ठरवायचे आहे
– दिल्ली आणि महाराष्ट्रातील निकालांमुळे विरोधी पक्ष एकत्र यायला पाठबळ मिळाले आहे
– विरोधी पक्षांना युती ही राज्यनिहाय करावी लागणार आहे
– कर्नाटक निकालामुळे एक लक्षात आले की कर्नाटक प्रमाणे केंद्रातल्या सरकारवर पण लोकांची नाराजी होती
– या नाराजीचा विरोधी पक्षांनी फायदा घ्यायला हवा
– आर्थिक ताण जनतेला जाणवू लागला आहे , मोदींकडून अपेक्षा होत्या पण ते त्या पूर्ण करू शकले नाहीयेत त्यामुळे नाराजी वाढली आहेत
– मोदी लोकप्रिय आहेत पण त्यांचे सरकार फार काही चांगले काम करू शकलेले नाहीत
– मध्यमवर्गीय लोकाना गेल्या काही वर्षात चांगले घडेल असे वाटत होते पण तो करिश्मा मोदी गेल्या ९ वर्षात आणू शकले नाहीत
– तो करिश्मा गरीब वर्गाला वाटायला हवा ज्यावर त्यांना मते मिळत होती आता ती परिस्थिती राहिलेली नाही
– मोदींचा जनसंघ आणि हिंदुत्ववादी मतदार मोदींपासून लांब जाईल असे वाटत नाही
– पण विरोधी पक्षांनी कंबर कसायला हवी
– जर विरोधी पक्ष हे करू शकले तर मोदीना आगामी निवडणुका जड जातील
– शिवसेनेची मते ही त्यांच्या आक्रमक वृतीला आहेत
– आणि ही मते भाजपला जातील असे वाटत नाहीत
– छोट्या छोट्या पक्षांमुळे आणि त्यांच्या हक्काच्या मतदारांमुळे मतांचे धुर्वीकरण होईल आणि त्यावर पुढचा निकाल लागेल
– महाराष्ट्रात येऊन अरविंद केजरीवाल काय करतात ह्याला काही महत्व नाही कारण आम आदमी पार्टी हा पक्ष महाराष्ट्रात वाढलेलाच नाहीये
– केजरीवाल आपल्याला राष्ट्रीय नेता म्हणून ओळख मिळावी म्हणून ही धडपड करत आहेत
– कर्नाटकात राहुल गांधी विरुद्ध मोदी अशी लढत झाली नाही त्यामुळे निकाल वेगळा लागला
– हिंदुत्व, मोदींचे नेतृत्व , कल्याणकारी योजना हे ३ फॅक्टर मोदीना आतापर्यंत यश मिळवून देत होता
– पण आता हे ३ फैक्टर लोकांच्या पचनी पडत नाहीयेत आणि त्यांच्या विरोधात काही प्रमाणात जात आहे
ADVERTISEMENT