ससंदेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून नवीन संसदेत (New Parliament) सुरुवात झाली आहे. या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपला घेरले आहे. पंतप्रधानांनी महाराष्ट्रात येऊन राष्ट्रवादीवर घोटाळ्यांचे आरोप केले होते, मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, तुम्ही भ्रष्टाचाराची चौकशी करा,आम्ही तुम्हाला सपोर्ट करू, असे थेट आव्हानच सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांना दिले आहे. (supriya sule criticize bjp narendra modi ncp irrigation scam new parliament session)
ADVERTISEMENT
नवीन संसदेत सुप्रिया सुळे (Supriya Sule) बोलत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले होते, तेव्हा त्यांनी एनसीपीला नेचरली करप्ट पार्टी म्हटले होते. यावेळी मोदींनी सिंचन घोटाळा आणि बँक घोटाळ्यासंदर्भात राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले होते. तसेच तुम्ही जो भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केलेलात. हे दोन नाही तर आणखीण चार देखील आहेत. त्यामुळे मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, माननीय पंतप्रधानांची जी इच्छा आहे, तुम्ही पुर्ण करून टाका, मी तुम्हाला समर्थन देईन, असे थेट सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. एकूणच सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीवर लावलेल्या घोटाळ्यांची चौकशी करावी, असे थेट आव्हानच भाजपला दिले आहे.
हे ही वाचा : Mhada Lottery : घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, मुंबईत मिळणार 9 लाखात घर
सप्रिया सुळे या चौकशीची मागणी करत असताना समोरून सत्ताधारी नेत्यांमधून अजित पवारांचे नाव घेण्यात आले. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, ही नात्याबद्दल गोष्ट नाही आहे, संसदेत माझे 800 भाऊ आहेत, एक थाेडी आहे, असे प्रत्युत्तर त्यांनी यावेळी दिले. भ्रष्टाचाराबाबत पंतप्रधान मोदींच्या मनात जे दु:ख आहे,भ्रष्टाचाराचे त्यांना नायनाट करायचा आहे, यासाठी पुर्ण ताकदीने आम्ही त्याच्यासोबत उभं राहायला तयार आहोत,असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
भाजप काँग्रेसने जड झाली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे जुने नेते यांच्याकडे गेले आहेत.60 वर्षात ज्यांनी ज्यांनी जे केलं, ते वॉशिंग मशीनमध्ये आहे, असा हल्लाबोल देखील सुप्रिया सुळे यांनी यावेळी केला.तसेच सप्रिया सुळे यांनी संसदेत महिला आरक्षणावर देखील भाष्य केले.देशात 50 टक्के लोकसख्या महिलांची आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन संसदेची सुरूवात महिला आरक्षणाच्या निर्णयापासून करावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला आरक्षणाचा निर्णय घेतला तर आम्ही त्यांना समर्थन देऊ, असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
ADVERTISEMENT