Pune : सुप्रिया सुळेंची अजित पवारांच्या आमदारासोबत खडाजंगी, डीपीडीसी बैठकीत काय घडलं?

मुंबई तक

20 Jul 2024 (अपडेटेड: 20 Jul 2024, 09:01 PM)

Supriya Sule, DPDM meeting :  आज सकाळपासूनच शरद पवार आणि अजित पवार एका बैठकीत एकत्र येणार असल्याच्या बातम्या येत असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष या बैठकीकडे लागले होते. दरम्यान आज बैठक सुरू झाल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यासमोरच खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांच्यात जोरदार वाद झाला होता.

 supriya sule verbal fight with mla sunil shelke front of ajit pawar and sharad pawar dpdc meeting in pune

सुप्रिया सुळेंची अजित पवारांच्या आमदारासोबत वादावादी

follow google news

बातम्या हायलाइट

point

सुप्रिया सुळेंची अजित पवारांच्या आमदारासोबत जोरदार वाद

point

निधीवाटपावरून सुप्रिया सुळेंचा बैठकीत प्रश्न

point

अजित पवारांनी मध्यस्ती करत सोडवला प्रश्न

Supriya Sule, DPDC meeting : पुणे जिल्हा नियोजन समितीची उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली आहे. या बैठकीला खासदार शरद पवार (Sharad Pawar), खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह अनेक आमदार खासदार उपस्थित होते. ही बैठक वादळी ठरली आहे. कारण निधी वाटपावरून खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांच्यात जोरदार वाद झाला होता. त्यामुळे नेमकं या बैठकीत काय घडलं हे जाणून घेऊयात. (supriya sule verbal fight with mla sunil shelke front of ajit pawar and sharad pawar dpdc meeting in pune)
  
 आज सकाळपासूनच शरद पवार आणि अजित पवार एका बैठकीत एकत्र येणार असल्याच्या बातम्या येत असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष या बैठकीकडे लागले होते. दरम्यान आज बैठक सुरू झाल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यासमोरच खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांच्यात जोरदार वाद झाला होता.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Suryakumar Yadav : हार्दिक पंड्याला डावलून सूर्यकुमार यादवला का केलं कर्णधार?

 त्याचं झालं असं की बैठकीत सुप्रिया सुळे यांनी ''बारामती आणि शिरूर लोकसभा क्षेत्रात काम करण्यासाठी निधी दिला जात नाही. आणि दुसरीकडे मावळसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे'', अशी भूमिका मांडली होती. 
 
यावर ''ताई आमच्या मतदारसंघाचा उल्लेख सारखा सारखा का करता. ज्यावेळी बारामती करता मोठा निधी मिळत होता. त्यावेळी आम्ही बारामती, बारामती केले का?''  असा सवाल सुनील शेळेके यांनी केला होता. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये वाद झाला होता. 
 
या वादानंतर अजित पवारांनी मध्यस्थी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करू, आणि नक्की निधी दिला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर हा मिटला होता. यानंतर दुसऱ्या मुद्यावर चर्चेला सुरुवात झाली होती. 

हे ही वाचा : Majhi Ladki Bahin Yojana :...तर तुमचा अर्ज अपात्र ठरणार? हमीपत्रातील ‘ती’ अट आताच वाचून घ्या

 बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सुनील शेळके म्हणाले की,  मावळ तालुक्याला अधिकचा निधी दिला, असे सुप्रिया सुळेंच्या बोलण्यातून सातत्याने येत होते. यावर माझं इतकचं म्हणणं होतं. मागील 20 ते 25 वर्षात बारामतीला जो काय निधी मिळाला, त्याचा हिशोब मावळच्या जनतेने केला नाही आणि उद्याही करणार नाही. परंतु मावळला अधिकचा निधी मिळाला हे सातत्याने बोलणे आम्हाला आवडलं नाही. म्हणून मी स्पष्टच भूमिका मांडली, बारामतीला जितका निधी मिळाला तितका मावळल मिळाला नाही, असे शेळके यांनी सांगितले. 
 
 माझं म्हणणं त्यांनी पुर्णपणे ऐकलं नाही. मावळला दिल्याबद्दल त्यांचे आभार आहेत. त्यामुळे जो न्याय तुम्ही मावळला देता, तोच न्याय तुम्ही बारामती आणि शिरूरला दिला पाहिजे. ही अपेक्षा होती, पण ते नाराज झाले. ते म्हणाले बारामतीला खूप दिलं तेव्हा आम्ही कुठे काय बोललो? त्याच्यावर फारस मी बोलावं असं मला वाटतं नाही. त्यांनी हा प्रश्न पालकमंत्र्यांना करावा, असे सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या आहेत. 

    follow whatsapp