राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार रविवारी 9 मंत्र्यासह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. या घटनेनंतर शिवसेना पाठोपाठ वर्षभरानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस फुटल्याची घटना घडली. या सर्व घडामोडींवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजकारणाचा चिखल झाल्याची मत व्यक्त केले होते. यासोबत महाराष्ट्राच्या वाट्याला आणखीण काय काय वाढून ठेवलंय अशी चिंता व्यक्त केली होती. यानंतर मनेसेच्याच एका कार्यकर्त्यांने ”राजसाहेब-उद्धवसाहेब आता तरी एकत्र या” अशी साद घातली होती. त्यामुळे महाराष्ट्रात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. (thackeray brothers Will come together Reactions of MNS leaders maharashtra politics)
ADVERTISEMENT
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मनसे कार्यकर्ता लक्ष्मण पाटील याने शिवसेना भवन परीसरात एक बॅनर लावले होते. या बॅनरमध्ये ”राजसाहेब-उद्धवसाहेब आता तरी एकत्र या” असा मजकूर लिहण्यात आला होता.या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे अशी साद मनसैनिकांनी घातली होती. मनसैनिकांनी लावलेल्या या पोस्टरवर, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो झळकले आहेत. यासोबत ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय, राजसाहेब-उद्धवसाहेब आता तरी एकत्र या, संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत आहे” असा मजकूर लिहून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याचे आवाहन मनसैनिकांनी केले होते. त्यामुळे आता राजकारणात ठाकरे बंधु एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे.
हे ही वाचा : MNS: ‘सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री होणार’, अजितदादांच्या बंडानंतर राज ठाकरेंचा बॉम्ब
मनसे नेते बाळा नांदगावकर यांननी या घडामोडींवर झी 24 तासला प्रतिक्रिया दिली होती. या प्रतिक्रियेत बाळा नांदगावकर म्हणाले की, या विषयावर मी आधीही भूमिका मांडलीय. महाराष्ट्राला ही माहितीय आणि देशालाही माहितीय, पण आता तो विषय माझ्या हातात राहिला नाही, तो साहेबांकडेच विषय असल्याचे देखील नांदगावकर म्हणाले आहेत. तसेच तो दोन भावंडांचा विषय आहे. त्यात मी बोलणे उचित नाही असे मी समजतो, असे देखील नांदगावकर म्हणतात. या प्रश्नावरती राज ठाकरेंनी 6-7 दिवसांनी माझा मेळावा येईल तेव्हा माझी मी भुमिका स्पष्ट करेन, असे नांदगावकर म्हणाले आहेत.
मनसेची आज बैठक देखील पार पडली. या बैठकीत राजकीय घडामोडींची माहिती देण्यात आली. राष्ट्रवादी फुटीवर चर्चा झाल्याचे मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितले.
ADVERTISEMENT