Udayanraje bhosale satara Lok sabha election 2024 : 2019 मध्ये सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभूत झालेल्या उदयनराजे भोसले यांनी पुन्हा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. कराड येथील एका कार्यक्रमात उदयनराजे यांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं आणि अप्रत्यक्षपणे लोकसभा उमेदवारीची इच्छा बोलून दाखवली. त्यामुळे भाजपचे उमेदवार म्हणून त्यांची चर्चा सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT
साताऱ्यातील कराडमध्ये कृषी प्रदर्शन कार्यक्रमात हे सगळं घडलं. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री तथा भाजपचे राज्यातील महत्त्वाचे नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. उमेदवारीबद्दल शब्द टाकण्यासाठी चालून आलेल्या संधीचा उदयनराजेंनी फायदा घेतल्याचे दिसले.
फडणवीसांचं उदयनराजेंनी केलं कौतुक?
उदयनराजेंनी फडणवीसांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले की, “मगाशी बैलगाडीत बसल्यानंतर फडणवीस यांनी कासरा पकडला, तेव्हा मी सांगितलं की, ही सुरूवात आहे. यापुढच्या काळात तुम्हाला राज्याचा कासरा हाती घ्यावा लागणार आहे. ही सगळ्यांची मनापासून खूप इच्छा आहे”, असे ते म्हणाले.
हेही वाचा >> काँग्रेस आंबेडकरांच्या कात्रीत! ‘न्याय यात्रे’त सहभागी होणार, पण ‘या’ अटीवर
“मलाही टीममध्ये घ्या”, उदयनराजेंनी फडणवीसांकडे टाकला शब्द
सध्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. कुणाला तिकीट मिळणार, कुणाचं तिकीट कापलं जाणार, याबद्दल वेगवेगळी माहिती समोर येत आहे. अशात उदयनराजे यांनी अप्रत्यक्षपणे पुन्हा लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली.
हेही वाचा >> काय आहे खिचडी घोटाळा, ठाकरेंचे निकटवर्तीय चव्हाणांना का झाली अटक?
उदयनराजे भोसले म्हणाले, “पहिली जी रणजी मॅच असेल, त्या टीमचा कॅप्टन तुम्ही म्हणून तुम्ही इथं यावं आणि तुमच्या आदेशाखाली ती मॅच व्हावी. आम्ही तुमचे मित्रमंडळी आहोत. फक्त तुमच्या टीममध्ये आम्हाला घ्या. राखीव ठेवू नका म्हणजे झालं”, अशी इच्छा उदयनराजेंनी बोलून दाखवली.
तीन वेळा खासदार आल्यावर दिला होता राजीनामा
उदयनराजे भोसले हे सध्या भाजपचे राज्यसभेचे उमेदवार आहेत. सुरूवातीला भाजप, नंतर काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर ते पुन्हा भाजपत आले. 2009, 2014, आणि 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून सातारा लोकसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली. मात्र, 2019 मध्ये त्यांनी सहा महिन्यातच राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पोटनिवडणूक झाली. त्यात त्यांचा पराभव झाला होता. आता पुन्हा ते लोकसभेसाठी तयारी करत आहेत.
ADVERTISEMENT