राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले पाहण्यासाठी अनेकजण वाट पाहतायत. यामध्ये राजकीय आणि अराजकीय अशा अनेक लोकांचा समावेश आहे. राज आणि उद्धव हे राजकारणात कधी एकत्र एकत्र येतील हे माहिती नाही, पण एका खास लग्न सोहळ्यासाठी दोन्ही नेते एकत्र आल्याचं पाहायला मिळालं आहे. राज ठाकरे यांच्या भाच्याचं दादरमध्ये आज लग्न आहे. या लग्नासाठी उद्धव ठाकरे कुटुंबासह उपस्थित असल्याचं दिसलं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> NCP Portfolio list: भाजपची अजितदादांवर मेहरनजर? दिली 'वजनदार' खाती!
राजकारणामध्ये आजवर अनेकदा दोघांनीही एकमेकांवर सडकून टीका केल्याचं दिसलं. दोघांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना कधीच माघार घेतली नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्येही असेच आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले होते. त्यातच आता हे दोन्ही नेते एकत्र दिसल्यानं चर्चा होते आहे.
राज्यात मागच्या काही वर्षांमध्ये राजकीय घडामोडींमध्ये दोन्ही नेत्यांची अत्यंत महत्वाची भूमिका राहिली आहे. एकीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पडलेली मोठी फूट आणि याच भाजपने तयार केलेली नवी महायुती यासंदर्भानं अनेक घडामोडी राज्यात घडल्या. या सर्व घडामोडीदरम्यान ठाकरे ब्रँडवर प्रेम करणाऱ्या अनेकांना या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं अशी इच्छा व्यक्त केली. मात्र, तशा शक्यता दोघांकडूनही दिसले नाही.
"आम्ही एकत्र येऊ नये यासाठी अनेक लोक प्रयत्न करत असतात"
राज ठाकरे यांच्याकडून उद्धव ठाकरेंना एकत्र येण्यासाठी प्रस्ताव देण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र तो उद्धव ठाकरेंनीच फेटाळला अशी चर्चा नेहमी होते. मात्र राज ठाकरेंनी पुन्हा एकदा एका मुलाखतीत सकारात्मक भूमिका मांडल्याचं दिसतंय. राज ठाकरे यांनी या वादावर लोकमतला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली होती. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं अशी भूमिका अनेक शिवसैनिक आणि मनसैनिक तसंच मराठी माणूस व्यक्त करत असतो. याबद्दल राज ठाकरे यांना विचारलं असता ते म्हणाले होते, आम्ही एकत्र येऊ नये यासाठी अनेक लोक प्रयत्न करत असतात. त्यामध्ये आतलेही आहेत आणि बाहेरचेही. मात्र मी अलर्ट असतो. एकत्र येण्याचा विषय एकट्याच्या इच्छेचा नाही. एकत्र यायचं असेल तर त्यासाठी चर्चा होणं गरजेचं आहे. चर्चा होत नसेल तर बोलण्याला काय अर्थ आहे असं राज ठाकरे म्हणाले होते.
ADVERTISEMENT