Shiv Sena UBT: उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया, हृदयात होते ब्लॉकेज...नेमकं काय घडलं?

मुंबई तक

14 Oct 2024 (अपडेटेड: 14 Oct 2024, 07:15 PM)

Uddhav Thackeray Health Update : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आज अँजिओप्लास्टी सर्जरी करण्यात आली आहे. दुपारी 12 वाजता ही सर्जरी पार पडली होती. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. खरं तर ठाकरे सकाळी 8 वाजताच एच एन रुग्णालयात चेकअपसाठी दाखल झाले होते.

uddhav thackeray angioplasty surgery had blockage in heart admitted in mumbai hospital

उद्धव ठाकरे यांच्यावर आज अँजिओप्लास्टी सर्जरी करण्यात आली आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

उद्धव ठाकरे यांच्यावर अँजिओप्लास्टी सर्जरी

point

हार्टमध्ये ब्लॉकेजस आढळून आले होते.

point

ठाकरेंची प्रकृती स्थिर असल्याचीही माहिती आहे.

Uddhav Thackeray Health Update : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आज अँजिओप्लास्टी सर्जरी करण्यात आली आहे. दुपारी 12 वाजता ही सर्जरी पार पडली होती. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. खरं तर ठाकरे सकाळी 8 वाजताच एच एन रुग्णालयात चेकअपसाठी दाखल झाले होते. यावेळी त्यांच्या हार्टमध्ये ब्लॉकेजस आढळून आले होते. त्यानंतर त्यांच्यावर अँजिओप्लास्टीची सर्जरी पार पडली आहे. (uddhav thackeray angioplasty surgery had blockage in heart admitted in mumbai hospital) 

हे वाचलं का?

उद्धव ठाकरे यांना मागील दोन-तीन दिवसांपासून त्रास जाणवू लागल्याने आज सकाळी मुंबईतील रिलायन्स हरिकिसन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासणी केली असता हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये ब्लॉकेजस आढळून आले होते. त्यानंतर ठाकरेंवर अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सध्या उद्धव ठाकरे रूग्णालयात भरती असून डॉक्टरांची टीम त्यांची काळजी घेत आहे. तसेच ठाकरेंची प्रकृती स्थिर असल्याचीही माहिती आहे.

हे ही वाचा : Mumbai Tak Chavadi : 'बाळासाहेबांनी राणेंना दिलेला 'हा' शाप', भास्कर जाधवांनी हे काय सांगितलं...

दरम्यान याआधी 2012 मध्ये देखील उद्धव ठाकरे यांच्यावर अँजिओप्लास्टी झाली होती. त्यानंतर आता 12 वर्षानंतर त्यांच्यावर पुन्हा एकदा अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. 

उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीविषयी आदित्य ठाकरे यांनी माहिती दिली आहे. 'आज सकाळी, उद्धव ठाकरेजी यांनी सर एचएन रिलायन्स रुग्णालयात पूर्व नियोजित तपासणी केली. तुमच्या शुभेच्छांसह, सर्व काही ठीक आहे, आणि ते कामावर येण्यासाठी तसेच लोकांची सेवा करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे', असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. 

हे ही वाचा : Baba Siddique : 700 शूटर, 11 राज्यात नेटवर्क, दाऊद इब्राहिम सारखीच आहे बिश्नोई गँग?

दसरा मेळाव्यात ठाकरे काय बोलले? 

आज त्यांनी जी एक जाहिरात केली आहे. 'हिंदुत्व आमचा श्वास, मराठी आमचा प्राण', पण पुढच्या ओळी काही बाकी आहेत. 'हिंदुत्व आमचा श्वास, मराठी आमचा प्राण',अदानी आमची जान, आणि आमची शेटजींचे श्वान,' अशा ठाकरेंनी जाहिरातीवरून शिंदेवर हल्ला चढवला आहे.हे शेपूट हलवणारे, मी कुत्र्यांचा अपमान अजिबात करू इश्चित नाही. मी श्वान प्रेमी आहे. पण लांडगा प्रेमी नाही आहे. हे लांडगे आहेत. वाघाचं कातडं पांघरण्याचा प्रयत्न करतायत. पण त्यांचं काय काय उघड पडतंय, त्यांना माहित नाही आहे, असा हल्ला देखील ठाकरेंनी शिंदे सेनेवर चढवला आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगावर देखील स्वकीयच चालून आले होते. पण महाराजांनी बघितलं नाही हा कोण आहे. जो स्वराज्यावर चालून आला, त्याचा शिरच्छेद केला. तशीच ही लोक आपल्या अंगावर चालून येतायत, याचा राजकारणातून शिरच्छेद करावाचं लागेल, असे देखील ठाकरे म्हणाले आहेत. 
 

    follow whatsapp