Uddhav Thackeray : " मोदींनी भ्रष्टाचाऱ्यांवर पांघरूण घालण्यासाठी...", मविआच्या आंदोलनात उद्धव ठाकरे कडाडले

मुंबई तक

01 Sep 2024 (अपडेटेड: 01 Sep 2024, 12:45 PM)

Uddhav Thackeray On PM Narendra Modi : महाविकास आघाडीने महायुती सरकारविरोधात जोडो मारो आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. राजकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी मविआने आज सकाळपासून मुंबईतील हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया असं आंदोलन सुरु केलं आहे.

Uddhav Thackeray and PM Narendra Modi

Uddhav Thackeray and PM Narendra Modi

follow google news

बातम्या हायलाइट

point

महाविकास आघाडीचं मुंबईत जोडो मारो आंदोलन

point

महाविकास आघाडीने महायुती सरकारला धरलं धारेवर

point

उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली घणाघाती टीका

Uddhav Thackeray On PM Narendra Modi : महाविकास आघाडीने महायुती सरकारविरोधात जोडो मारो आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. राजकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी मविआने आज सकाळपासून मुंबईतील हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया असं आंदोलन सुरु केलं आहे. पोलिसांची परवानगी नसतानाही मविआने हे आंदोलन सुर केल्यानं विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. अशातच उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

हे वाचलं का?

भ्रष्टाचाऱ्यांवर पांघरूण घालण्यासाठी मोदींनी माफी मागितली. महाराजांची माफी मग्रुरीने मागून चालणार नाही. हा शिवप्रेमी महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्राच्या आत्म्याचा अपमान केला आहे. महाराष्ट्र धर्माचा अपमान केला आहे. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करत नाही आणि करणार नाही. महाराष्ट्रद्रोह्यांना गेट आऊट ऑफ इंडिया केल्याशिवाय थांबू नका. भ्रष्टाचाऱ्यांवर पांघरूण घालण्यासाठी मोदींनी माफी मागितली, असं म्हणत ठाकरेंनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

हे ही वाचा >> Sanjay Raut : ''...तर तुमचा कडेलोट केला असता'', संजय राऊतांनी महायुतीवर डागली तोफ

उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनाप्रमुख नेहमी सांगायचे राजकारण हे गजकरण झालं आहे. पण या चूकीला माफी नाही. मुद्दामहून आज आपल्या मनातला संताप व्यक्त करण्यासाठी हे जे ठिकाण निवडलं आहे, म्हणजे गेट वे ऑफ इंडिया म्हणजे देशाचा प्रवेशद्वार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने हे बेकायदेशीर सरकार घटनाबाह्य पद्धतीने बसलं आहे. त्यांना आपण सांगितलं पाहिजे की, गेट आऊट ऑफ इंडिया. परवाच देशाच्या पंतप्रधानांनी माफी मागितली. माफी मागताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती.

ती मग्रुरी तुम्हाला पसंत आहे का? मग्रुरीने माफी आम्हाला मान्य नाही. तुम्ही महाराजांची एव्हढी थट्टा करता? महाराजांचा पुतळा पडला म्हणून माफी मागितली की त्यांच्या पुतळा बसवताना भ्रष्टाचार केला, म्हणून माफी मागितली, भ्रष्टाचाऱ्यांवर पांघरूण घालण्यासाठी माफी मागितली, मोदीजी तुम्ही त्यावेळी निवडणुकीसाठी आलात, हे आम्हाला माहित होतंच. 

हे ही वाचा >> Maharashtra Live News Updates : महाविकासआघाडी-महायुतीनं एकमेकांविरोधात उपसलं आंदोलनाचं हत्यार!

आपल्या महाराष्ट्राने पहिला नौदल दिन मोठ्या दिमाखात साजरा केला होता. पण त्याचवेळी घाईघाईने भ्रष्टाचार करून शिवरायांचा पुतळा बसवण्याची काही गरज नव्हती. माफी तुम्ही कुणा कुणाची मागणार? घाईगडबडीनं संसद भवन उभं केलं म्हणून तुम्ही माफी मागणार? दिल्लीच्या विमानतळाची छत कोसळत आहेत, सर्व गोष्टींबद्दल मोदीजी तुम्ही माफी मागता, पण जसं आपले महामहीम राष्ट्रपती म्हणाले आता बस्स झालं. महाराजांची माफी मग्रुरीने मागून चालणार नाही. हा शिवप्रेमी महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्राच्या आत्म्याचा अपमान केला आहे. महाराष्ट्र धर्माचा अपमान केला आहे. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करत नाही आणि करणार नाही. महाराष्ट्रद्रोह्यांना गेट आऊट ऑफ इंडिया केल्याशिवाय थांबू नका, असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं.

    follow whatsapp