Uddhav Thackeray Interview with Sanjay Raut : शिवसेनेतील बंडखोरीला वर्ष झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी एका बंडखोर आमदार, खासदारांवर निशाणा साधला. दुसरीकडे विरोधकांच्या बैठकीनंतर भाजपने एनडीएची बैठक घेतली. यावरून ठाकरेंनी मोदींना चिमटा काढलाय. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची संजय राऊत यांनी घेतलेल्या ‘आवाज कुणाचा’ पॉडकास्टसाठी मुलाखत घेतली.
ADVERTISEMENT
शिवसेनेतील बंडखोर आमदार, खासदारांबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “काही वेळा आपली फसगत होते. ज्यांना आपण आपलं मानतो ती बांडगुळं निघतात. तरीदेखील ती आपल्यासोबत आहेत असं आपल्याला वाटत राहतं, पण प्रत्यक्षात ती त्या फांदीवरती मूळ वृक्षाचा रस शोषत असतात. वृक्षाला वाटतं, हे आपल्याच सोबत आहेत.”
निवडणूक आयोग आणि शिवसेनेचा फैसला
उद्धव ठाकरे असंही म्हणाले की, “निवडणूक आयोगाचं काम हे निवडणूक निशाणी किंवा चिन्ह देण्याचं आहे. पक्षाचं नाव देण्याचं किंवा पक्षाचं नाव बदलण्याचं नाही. म्हणून आता जो विचित्र निकाल निवडणूक आयोगाने दिलेला आहे त्याविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात गेलोय आणि मला खात्री आहे की, ज्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडताना ज्या गोष्टींची पूर्तता करण्याची आवश्यकता होती त्या सर्व गोष्टींची पूर्तता आपण केली आहे आणि ती पूर्तता केल्यामुळेच मला खात्री आहे की, ‘शिवसेना’ हे नाव आपल्याला पुन्हा मिळेल.”
मोदींना टोला, एनडीएच्या बैठकीबद्दल ठाकरे काय म्हणाले?
“बऱ्याच वर्षांनंतर या देशात ‘एनडीए‘ नावाचा काहीतरी अमिबा जिवंत आहे हे कळलं आणि आपण जे देशभक्त राजकारणी आहोत त्यांची ‘इंडिया’ नावाची एक आघाडी केलेली आहे त्याला उत्तर देण्यासाठी त्याच दिवशी आपल्या पंतप्रधानांनी (नरेंद्र मोदी) एकदम आपल्या आठवणीतल्या गोष्टी बाहेर काढल्या ठेवणीतल्या. आणि छत्तीस पक्षांची जेवणावळ त्यांनी घातली”, असा टोला ठाकरेंनी लगावला.
वाचा >> ‘त्या’ खासदारावरुन राडा… जाणून घ्या खासदार कधी आणि कसे होतात निलंबित?
पुढे ते असंही म्हणाले की, “खरं म्हणजे, छत्तीस पक्षांची त्यांना गरज नाहीय. त्यांच्या ‘एनडीए’मध्ये आता ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय हे तीनच पक्ष मजबूत आहेत”, असं सांगत केंद्रीय यंत्रणांच्या कारवायांबद्दल भाष्य केलं.
“शिवसेना मजबूत होतीच, पण आता अडीच वर्षांत मी जे काही करू शकलो त्याच्यामुळे महाराष्ट्रातली जनता मला त्यांच्या कुटुंबातील सदस्य मानायला लागली. ही माझी कमाई आहे. मोठी कमाई आहे. त्या एका नात्याने शिवसेनेसोबत पूर्वी कधीही नव्हते असे लोकही, अशी जनताही शिवसेनेसोबत जोडली गेली आहे”, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
वाचा >> Sangli: ‘त्या’ महिलेच्या घरात असतानाच गुंड सच्या टारझनची आधी बोटं तोडली अन्…
“लोकं म्हणताहेत की, जे तुमच्यासोबत घडलं ते अयोग्य आहे. ही संस्कृती, हा संस्कार महाराष्ट्राचा नाही. तुम्ही काळजी करू नका. आम्ही सोबत आहोत. म्हणजे मला लोकांना काही सांगावंच लागत नाहीय”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
ADVERTISEMENT