Uddhav Thackeray : मविआने महाराष्ट्र बंदची हाक का दिली? किती वाजेपर्यंत पाळायचा बंद?

मुंबई तक

23 Aug 2024 (अपडेटेड: 23 Aug 2024, 01:38 PM)

Uddhav Thackeray On Maharashtra Bandh : बदलापूरमध्ये झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने २६ जुलैला बंदची हाक दिली आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray at a press conference in New Delhi on August 7; (Photo: Arun Kumar)

Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray at a press conference in New Delhi on August 7; (Photo: Arun Kumar)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मविआने महाराष्ट्र बंदची हाक का दिली?

point

महाराष्ट्र बंदमध्ये काय सुरु राहणार?

point

उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?

Uddhav Thackeray On Maharashtra Bandh : बदलापूरमध्ये झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने २४ ऑगस्टला बंदची हाक दिली आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. उद्याचा बंद हा राजकीय कारणसाठी नाही. उद्याचा बंद हा विकृती विरुद्ध संस्कृती यासाठी असणार आहे. सर्व महिला आणि पालकांना असं वाटतंय की आपली मुलगी शाळेत सुरक्षित राहिल का? अनेक मातांना वाटतंय, कामाच्या ठिकाणी गेल्यावर आपण सुरक्षित राहू का? त्याच अस्वस्थतेला वाचा फोडण्यासाठी उद्याचा बंद आहे, असं ठाकरे म्हणाले. (Mahavikas Aghadi has called for a bandh on 24 august in the wake of the sexual assault incident in Badlapur. Uddhav Thackeray has given a big reaction to this in the press conference.)

हे वाचलं का?

पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे काय म्हणाले? 

"उद्याचा बंद हा राजकीय कारणसाठी नाही. उद्याचा बंद हा विकृती विरुद्ध संस्कृती यासाठी असणार आहे. सर्व महिला आणि पालकांना असं वाटतंय की आपली मुलगी शाळेत सुरक्षित राहिल का? अनेक मातांना वाटतंय, कामाच्या ठिकाणी गेल्यावर आपण सुरक्षित राहू का? त्याच अस्वस्थतेला वाचा फोडण्यासाठी उद्याचा बंद आहे. सरकार म्हणतंय आम्ही विरोधी आहोत.

हे ही वाचा >> "महाराष्ट्राचं पोलीस खातं भ्रष्टाचारानं बरबटलंय, कारण..."; संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

पण आम्ही या विकृतीचे विरोधी आहोत. त्यामुळे उद्याचा बंद विकृतीच्या विरोधकांनी केलेला आहे. मविआ आणि मित्रपक्षांचा यात सहभाग असणारच आहे. पण सर्व नागरिकांच्या वतीनंही आम्ही हा बंद करत आहोत. जात पात, धर्म, भाषा, भेद, राजकीय पक्ष या सर्व कक्षा ओलांडून यात सर्वांनी सहभागी व्हावं, ही माझी सर्वांना आग्रहाची विनंती आहे.कारण हा सामाजिक प्रश्न आहे."

हे ही वाचा >> Sharad Pawar Z Plus Security : शरद पवारांना आत्ताच का दिली Z प्लस सुरक्षा? 

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, आजपर्यंत जे बंद झाले आहेत, तसच उद्याचा बंद राहिल. कडकडीत बंद असायला पाहिजे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णवाहिका सेवा, वृत्तपत्र, फायब्रिगेड चालू राहतील. सणासुदीचे दिवस आहे, दहीहंडी उत्सव आहे, या सर्व गोष्टींचा विचार केल्यावर उद्याचा बंद दुपारी २ वाजेपर्यंत पाळावा. कारण अनेकांना उत्सव पण करायचे आहेत. या उत्सवात सुद्धा आपल्या मुली सुरक्षित राहतील की नाही. हा सुद्धा प्रश्न त्यांच्या मनात आहे. 

सरकारला काहीही म्हणू दे. मी जनतेच्या वतीनं बोलत आहे. जनतेला सुद्धा आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. जनतेचं मत हे निवडणुकांमध्येच व्यक्त करता येतं असं नाही, तर मधल्या काळातही जनतेनं मत व्यक्त करायला पाहिजे. जर ही यंत्रणा वेळेत हलली असती, तर हा उद्रेक झाला नसता. हे आंदोलन राजकारण्यांनी प्रेरित आहे, हे उत्स्फुर्त नव्हतं. मग उच्च न्यायालयाने याची स्वत:हून दखल घेतली आहे. उच्च न्यायालयाने राज्य सरकारला थोबडवलेलं आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली.

    follow whatsapp