काँग्रेस, राष्ट्रवादीचे तळवे चाटल्याच्या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरेनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना डिवचले. त्याचबरोबर हिंदुत्वावरून ठाकरेंनी भाजपवर टीकेची तोफ डागली. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे, नितीश कुमार, संगमा यांच्या उल्लेख करत शाहांना लक्ष्य केले. (Uddhav Thackeray hits out at amit Shah)
ADVERTISEMENT
छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या वज्रमूठ सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व आणि राजकीय आघाडीवरून भाजप, अमित शाहांना खडेबोल सुनावले.
उद्धव ठाकरे म्हणाले, “तुम्ही हिंदुत्व सोडले. का हिंदुत्व सोडले, तर काँग्रेससोबत गेले म्हणून तुम्ही हिंदुत्व सोडले. मी त्यांना एक प्रश्न विधानसभेत विचारला होता. प्रत्येक सभेत विचारतो. तुमच्यासमोरही विचारतो. मी काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडले असेल, तर मुफ्ती मोहम्मद आणि मेहबुबा मुफ्तींबरोबर मांडीला मांडी लावून तुम्ही बसला होतात, तेव्हा तुम्ही काय सोडले होते? आमच्या हिंदुत्वाची मोजमापे घेण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये.”
हेही वाचा – Shiv Sena UBT: 56 इंची छाती आहे का?; मोदींवर प्रश्नांचा भडीमार, ‘त्या’ भाषणाची खिल्ली
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “अमित शाह मध्ये पुण्यात येऊन गेले. माझ्यावर आरोप केले. सत्तेसाठी याने काँग्रेस, राष्ट्रवादीचे तळवे चाटले. मी अमित शाहांना विचारतो… बऱ्याचदा काय होते… असे काही नाही की मला शिवसेनाप्रमुखांची भाषा येत नाही. पण, मला आवरावे लागते. कारण ते शब्द आणि ती भाषा त्यांनाच शोभत होती. मला शोभणारी नाही.”
उद्धव ठाकरेंचा खडा सवाल; म्हणाले, “नितीश कुमाराचं काय चाटत होतात?”
“मी फक्त एवढेच म्हटले की, आम्ही सत्तेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीचे तळवे चाटत होतो, तर तुम्ही सत्तेसाठी मिंध्याचं काय चाटताय? बिहारमध्ये नितीश कुमार आणि लालूंचे जे आधी चाललेले सरकार होते, ते परत स्थापन झाले. केवढा भयानक प्रकार आहे. चांगली चाललेली सरकारे फोडायची, पाडायची. मग त्यावेळी नितीश कुमार लालूंचं सरकार पाडून नितीश कुमाराचं काय चाटत होतात?”, असा उलट सवाल उद्धव ठाकरेंनी अमित शाहांना केला.
Video : …आणि उद्धव ठाकरेंनी भर सभेतच केली एकनाथ शिंदेंची नक्कल, म्हणाले, ‘वाचू का?’
अमित शाहांना मला आणखी एक विचारायचे आहे की, तुम्ही जे संगमांबरोबर सरकार स्थापन केले आहे. त्याच संगमांवर तुम्ही अत्यंत वाईट आरोप केले होते, भ्रष्टाचाराचे. मग अमितजी आता असे नेमके काय की, संगमांनी हिसका दाखवल्यानंतर आता तुम्ही संगमांचं काय चाटता आहात?”, असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी थेट अमित शाहांनाच ललकारले.
पक्षाचे नाव भ्रष्ट जन पार्टी ठेवा; भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी सुनावले खडेबोल
उद्धव ठाकरे म्हणाले, “वॉशिंग पावडर निरमाची आता बदनामी व्हायला लागली आहे. भाजपबद्दल मी जे बोलत होतो की, विरोधी पक्षामध्ये दिसला भ्रष्ट की घेतला पक्षात, दिसला भ्रष्ट की घेतला पक्षात. संपूर्ण देशातील विरोधी पक्षातील भ्रष्ट माणसे या पक्षात आहेत. नाव आहे भारतीय जनता पक्ष. हा भारतीय जनतेचा अपमान आहे.”
“भारतीय जनता पक्ष म्हणून तुम्ही भ्रष्टचाऱ्यांना पक्षात घेत असाल, तर पक्षाचे नाव बदलून भ्रष्ट जन पार्टी ठेवा, भारतीय जनता पार्टी तुम्हाला लावता येणार नाही. सगळी भ्रष्ट माणसांची पार्टी”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
ADVERTISEMENT