Maratha Reservation : "मराठा आरक्षणाचे खरे कट्टर विरोधक उद्धव ठाकरेच"

मुंबई तक

31 Jul 2024 (अपडेटेड: 31 Jul 2024, 10:54 AM)

BJP Uddhav Thackeray : मराठा आरक्षणाचा निर्णयाचा चेंडू उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींच्या कोर्टात टाकला आहे. त्याला आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

भाजपची उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र.

शिवसेना (युबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला

point

भाजपची उद्धव ठाकरेंवर टीका

point

आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाकरेंना भाजपने काय म्हटलंय?

Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीवर उद्धव ठाकरेंनी भूमिका मांडली. ठाकरेंनी पंतप्रधान मोदींनी निर्णय घ्यावा. लोकसभेत आम्ही पाठिंबा देऊ, अशी भूमिका मांडली. ठाकरेंनी मोदींच्या कोर्टात चेंडू ढकलल्यानंतर आता भाजपने पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे मराठा आरक्षणाचे कट्टर विरोधक आहेत, असा हल्लाबोल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. (BJP has criticized that Uddhav Thackeray is an opponent of Maratha reservation)

हे वाचलं का?

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे की, "ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता व न्यायालयात टिकणारे असे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही भाजपाची भूमिका पण उद्धव ठाकरे हे मराठा आरक्षण कसे मिळावे यावर बोलायला तयार नाहीत."

उबाठाच्या नेत्यांनी मराठा आंदोलकांना मारहाण केली -भाजप

"मराठा मोर्चाची खिल्ली उद्धव ठाकरे यांच्याच मुखपत्रातून करण्यात आली. मराठा आंदोलकांना मारहाण उबाठाच्या नेत्यांनी केला. मुख्यमंत्री असताना सर्वोच्च न्यायलयात उद्धव ठाकरे मराठा आरक्षण टिकवू शकले नाहीत", असे म्हणत उपाध्ये यांनी ठाकरेंना लक्ष्य केले आहे.

हेही वाचा >> मुंबई, पुणे,कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांमध्ये पाऊस घालणार धुमाकूळ! 

"मराठा आरक्षणसाठी राज्य सरकारने बोलविलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर उबाठाचा बहिष्कार. मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना भेटण्यास नकार. आता तरी मराठा आरक्षणावर उद्धव ठाकरे भूमिका स्पष्ट करा नुसत गोल गोल बोलू नका", असा टोला केशव उपाध्य यांनी ठाकरेंना लगावला.

उद्धव ठाकरे काय बोलले होते?

माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणालेले की, "आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा अधिकार हा राज्याला नाहीये. जसं बिहारमध्ये आरक्षण दिले होते, ते कोर्टाने उडवलं. मर्यादा वाढवायची असेल, तर लोकसभेमध्ये हा प्रश्न सुटू शकतो. मी माझे खासदार सोबत द्यायला तयार आहे. सर्वांनी मोदींकडे जावं."

हेही वाचा >> अमोल मिटकरींची गाडी फोडणाऱ्या मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू! 

"मोदी सुद्धा नेहमी सांगतात की मी मागास जाती जमातीचा. गरिबीतीला संघर्ष त्यांना चांगला माहिती आहे. याबाबतीत मोदी घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे. लोकसभेत सर्वमान्य तोडगा निघत असेल, तर मी त्याला पाठिंबा द्यायला तयार आहे", अशी भूमिका ठाकरेंनी मांडली.

    follow whatsapp