Uddhav Thackeray : ‘देशात मोदी-शहाच निवडणूक आयोग बनलाय’, ठाकरेंचा सामनातून हल्ला

प्रशांत गोमाणे

19 Nov 2023 (अपडेटेड: 19 Nov 2023, 04:58 AM)

भाजपच्या पायाखालची वाळ या निवडणूकीत सरकली आहे. नरेंद्र मोदी, अमित शहांपासून सर्वच भाजप नेत्यांच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले आहेत. त्यामुळे धार्मिक प्रचार करून बुडती नौका वाचवणे हे त्यांचे धोरण बनले आहे.

mumbaitak

mumbaitak

follow google news

Uddhav Thackeray Criticize Narendra Modi and Amit Shah Saamna Editorial : देशात सध्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सूरू आहे. या निवडणूकीतील प्रचारासाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. मध्यप्रदेशात भाजपकडून अयोध्यावारीची प्रलोभने दिली गेली आहे. यावर सामनाच्या रोखठोकमधून देशाला निवडणूक आयोग आहे काय? असा सवाल करण्यात आला आहे. त्यासोबत देशाचा निवडणूक आयोग हा आज मोदी-शाह निवडणूक आयोग बनलाय, असा टोलाही हाणला आहे. (udhhav Thackeray criticize pm narendra modi and amit shah madhya pradesh vidhan sabha election saamna editorial)

हे वाचलं का?

सामनाच्या अग्रलेखात काय?

देशातला निवडणूक आयोग हा पिंजऱ्यातला पोपट झाला आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडुकांच्या निमित्ताने ते सिद्ध झाले आहे. भाजपच्या पायाखालची वाळ या निवडणूकीत सरकली आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi), अमित शहांपासून (Amit Shah) सर्वच भाजप नेत्यांच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले आहेत. त्यामुळे धार्मिक प्रचार करून बुडती नौका वाचवणे हे त्यांचे धोरण बनले आहे.

हे ही वाचा : IND vs AUS Final : भारत-ऑस्ट्रेलियात वर्ल्ड कपची फायनल लढत! खेळपट्टी आणि हवामान कसं आहे?

मध्यप्रदेशातील गुणा येथील प्रचारात गृहमंत्री अमित शहा यांनी ”मध्य प्रदेशात भाजप सरकार आणा आणि रामलल्लाचे मोफत दर्शन घ्या’. जनतेला रामाचे दर्शन घडवू. त्याचा खर्च भाजप करील. अमित शहा यांचे विधान धार्मिक प्रचारात मोडते. मतदारांना ‘लाच’ देऊन मते मागण्याचा हा प्रकार धक्कादायक आहे. यावर देशाचा निवडणूक आयोग मूग गिळून व डोळे बंद करून बसला. हे लोकशाहीस मारत आहे.

हे ही वाचा : Maratha Reservation : ‘…म्हणून तुम्हाला तुरुंगवास भोगावा लागला’, जरांगे पाटलांचा भुजबळांवर पलटवार

पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केवा व त्यावर भारत-पाकिस्तान, हिंदुत्व हे मुद्दे आणून 2019 च्या निवडणुकीत उतरले.कश्मीर फाईल्स चित्रपट व पंडिताचे टार्गेट किलिंग या मुद्यावर त्यांनी भावना भडकवून हिंदु मते मागितली. पण पंडितांचे भले झाले नाही. कधी हिजाब तर कधी बजरंग बलीस प्रचारात उतरवून पंतप्रधान मोदी व त्यांच्या लोकांना निवडणूक आचारसंहितेचा सरळ भंग केला तरीही निवडणूक आचारसंहितेचा सरळ भंग केला तरीही निवडणूक आयोगाने साधी फडफड केली नाही.

भाजपच्याच राजवटीत उरीपासून पठाणकोट, पुलवामाचे अतिरेकी हल्ले झाले, पण या बेपिहल्ल्यात मेलेल्यांच्या हौतात्म्यांचा बाजार भरवून पंतप्रधानांसह भाजप नेते मते मागत फिरले आहेत. पुलवामाचे हत्याकांड म्हणजे सरकारची बेफिकिरी व त्यामुळे सदोष मनुष्यवध ठरतो, पण त्या हौतात्म्यावर मते मागितली जात असताना निवडणूक आयोग मूक-बधिर अवस्थेत दिल्लीच्या निर्वाचन आयोगात बसून होता. हे भंयकर आहे. अशा निवडणूक आय़ोगाकडून आता स्वतंत्र,निष्पक्ष निवडणूकांची अपेक्षा का करावी?

    follow whatsapp