Udhhav Thackeray : ठाकरेंना मोठा झटका? दिल्ली दौऱ्याची Inside Story

मुंबई तक

09 Aug 2024 (अपडेटेड: 09 Aug 2024, 02:47 PM)

Udhhav Thackeray News : ठाकरेंच्या दिल्लीत दौऱ्यात या जागा वाटप आणि मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत त्यांनी काँग्रेस हायकमांडशी चर्चा केल्याची माहिती आहे. मात्र काँग्रेस हायकंमाडने अद्याप मुख्यमंत्री पदाबाबत चेहरा जाहीर करण्यास नकार दिल्याची सुत्रांकडून माहिती मिळत आहे. त्यामुळे ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.

udhhav thackeray delhi tour maha vikas aghadi cm face rahul gandhi sonia gandhi meet congress sharad pawar ncp maharashtra politics

मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत त्यांनी काँग्रेस हायकमांडशी चर्चा केल्याची माहिती

follow google news

बातम्या हायलाइट

point

ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यात काय ठरलं?

point

जागा वाटप आणि मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत बैठकीत चर्चा

point

विधानसभा निवडणूक एकत्र मिळून लढूया

Uddhav Thackeray, Assembly Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सूरू केली आहे. या दरम्यान शिवसेना युबीटीचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दिल्ली दौऱ्यावर गेले होते. इंडिया आघाडीच्या (India Alliance) घटक पक्षांची भेट घेण्यासाठी हा दौरा होता. तसेच या दौऱ्यात या जागा वाटप आणि मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत त्यांनी काँग्रेस हायकमांडशी चर्चा केल्याची माहिती आहे. मात्र काँग्रेस हायकंमाडने अद्याप मुख्यमंत्री पदाबाबत चेहरा जाहीर करण्यास नकार दिल्याची सुत्रांकडून माहिती मिळत आहे. त्यामुळे ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. (udhhav thackeray delhi tour maha vikas aghadi cm face rahul gandhi sonia gandhi meet congress sharad pawar ncp maharashtra politics) 

हे वाचलं का?

 उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला होता. मात्र त्यांच्या या वक्तव्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा विरोध होता. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौरा करून पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत काँग्रेसच्या हायकमांडची चर्चा केली होती. मात्र महाराष्ट्र काँग्रेसने आधीच याबाबची कल्पना काँग्रेस हायकमांडला दिली होती. त्यामुळे काँग्रेस हायकमांडने देखील मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यास नकार दिला आहे. 

हे ही वाचा : Neeraj Chopra: 'खेल अभी बाकी है!' भारताच्या खात्यात 'रौप्य'; भालाफेकीत नीरज चोप्राचा मोठा पराक्रम! 

तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावरून उद्धव ठाकरे गुरुवारी संध्याकाळी मुंबईत दाखल झाले आहेत. यावेळी दिल्ली दौऱ्यात ठाकरेंनी इंडिया आघाडीच्या अनेक प्रमुख नेत्यांची भेट घेतली. सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी  विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे कुटुंबीयांसह काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. या दोन्ही नेत्यांच्या भेटीत त्यांनी जागावाटप आणि मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत चर्चा केली. या चर्चेतून मुख्यमंत्री पदावरून फारसा काही तोडगा निघू शकला नाही.  
त्यानंतर ठाकरे यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल आणि ज्येष्ठ वकील आणि खासदार कपिल सिब्बल यांची भेट घेतली होती. 

 दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी स्वत:ला मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शरद पवारांप्रमाणे काँग्रेसने देखील स्पष्ट केले की, विधानसभा निवडणूक एकत्र मिळून लढूया आणि त्यांनतर मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत चर्चा करू या. पण याआधी जागावाटपाला प्राधान्य देऊ या, असे ठरले होते. 

हे ही वाचा : MHADA Lottery 2024: उरले फक्त काही तास! मुंबईतील घराचं स्वप्न होणार साकार; असा करा अर्ज

याआधी उद्धव ठाकरे यांनी शरद पवार आणि काँग्रेसचे खासदार केसी वेणुगोपाल यांची भेट घेतली. या भेटीत महिन्याच्या अखेरीस महाविकास आघाडीमधील जागावाटप निश्चित करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. आणि निवडणुकाजवळ येईपर्यंत ती ताणू नका. यासोबतच जाहीरनामा आणि संयुक्त प्रचाराच्या रणनीतीवरही चर्चा झाली होती. 

दरम्यान सर्वात आधी निवडणूक जिंकण्याकडे सर्वांनी लक्ष केंद्रित केले पाहिजे. सर्वात जास्त ज्या पक्षाचे आमदार निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल. ही महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे. त्यामुळे विजयी झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत निर्णय घेतला जाईल, असा सल्ला पृथ्वीराज चव्हाण यांनी ठाकरेंना दिला आहे.  

    follow whatsapp