Ravindra Waiker : वायकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याआधी ठाकरे कडाडले, 'जा तिकडे, तुला पण आडवा करतो'

प्रशांत गोमाणे

10 Mar 2024 (अपडेटेड: 10 Mar 2024, 08:58 PM)

Udhhav Thackeray ON Ravindra Waiker : उद्धव ठाकरे रवींद्र वायकरांवर चांगलेच भडकले आहेत. 'जा तिकडे जा, तुला पण आडवा करतोय', असा इशाराच ठाकरेंनी रवींद्र वायकर यांचं नाव न घेता दिला आहे.

udhhav thackeray goregaun meet party office angry on ravindra waiker joining eknath shinde shivsena

जा तिकडे जा, तुला पण आडवा करतोय', असा इशाराच ठाकरेंनी रवींद्र वायकर यांचं नाव न घेता दिला आहे.

follow google news

Udhhav Thackeray ON Ravindra Waiker : जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणी ईडीच्या कचाट्यात सापडलेले ठाकरे गटाचे नेते रविवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या प्रवेशापुर्वी उद्धव ठाकरे रवींद्र वायकरांवर चांगलेच भडकले आहेत. 'जा तिकडे जा, तुला पण आडवा करतोय', असा इशाराच ठाकरेंनी रवींद्र वायकर यांचं नाव न घेता दिला आहे.(udhhav thackeray goregaun meet party office angry on ravindra waiker joining eknath shinde shivsena) 

हे वाचलं का?

उद्धव ठाकरे गोरेगावमधील शाखा भेटीच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, काही जण आज सुद्धा जातायत,जाऊ द्या त्यांना. उद्या तेच म्हणतील, तुम्ही जिंकलात पण मी नव्हतो तिकडे, अरे जा तु पण जा तिकडे तुला पण आडवा करतो. इतकी ताकद माझ्या मर्द शिवसैनिकांमध्ये आहे, असा इशाराच ठाकरेंनी नाव न घेता रवींद्र वायकरांवर केला आहे. 

हे ही वाचा : "मी दिवसभर रडत होते, शरदचा मला फोन आला…”,

ठाकरे पुढे म्हणाले की, शाखा भेटीच्या निमित्ताने एवढं सगळं माझं कुटुंब जमलंय, आता काय पर्वा आहे मला, कोण उतरायचा आहे तो उतरू द्या, असा कुणी शिल्लक राहता कामा नये. भाजपला मी भाडकाऊ जनता पक्षच म्हणतो. कारण यांच्यात कुणी नेता उरला नाही. विचार नाही. कोणी आदर्श नाही म्हणून अशोक चव्हाणांना घेतलं, असा टोला ठाकरेंनी भाजपला लगावला आहे. 

दरम्यान हा लढा गद्दार विरूद्ध निष्ठावाण असा आहे. एका बाजूला देशभक्त आहेत, तर दुसऱ्या बाजूला द्वेशभक्त आहेत. त्यामुळे देशभक्त विरूद्ध  द्वेशभक्त असा लढा आहे. लोकशाही विरूद्ध हुकुमशाही असा लढा आहे, असे ठाकरे यांनी सांगितले आहे. 

हे ही वाचा : Ramdas Kadam : ''भास्कर जाधव गुजरात बॉर्डरपर्यंत गेले, पण...''

ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका 

छत्रपती शिवाजी महाराजांना किमान साडेतीन वर्ष होऊन गेली, पण साडेतीन वर्षानंतरही खंडोजी खोपडे, सुर्याजी पिसाळ, अनाजीपंत यांची नाव घेतल्यानंतर  त्यांना आपण गद्दार म्हणतो, म्हणजे साडेतीन वर्षानंतर देखील ते त्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसू शकले नाही. आता जे गद्दारी करतायत, त्यांनी खंडोजी खोपडे, सुर्याजी पिसाळ यांची औलाद असतील, तर त्यांनी जा त्यांनी मिंधेच्या दाढीखाली जावं. जाऊ शकता कारण तो सुद्दा तीच आहे औलाद, गद्दार म्हटलं तर गद्दारच, अशी टीका ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली. 

    follow whatsapp