Who is Amit Gorakhe : ओंकार वाबळे,पुणे : विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणूकीसाठी भाजपने 5 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे नाव देखील जाहीर करण्यात आले आहे. पंकजा मुंडे सोबत अमित गोरखे (Amit Gorakhe) यांना देखील विधान परिषदेची उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे भाजपकडून उमेदवारी जाहीर झालेले अमित गोरखे कोण आहेत? हे जाणून घेऊयात. (vidhan parishad election 2024 bjp declare 5 candidate who is amit gorkhe)
ADVERTISEMENT
कोण आहेत अमित गोरखे ?
अमित गोरखे यांचे मूळ गाव श्रीगोंदा, अहिल्यानगर आहे. पण ते गेल्या 40 वर्षापासून पिंपरी चिंचवडचे रहिवासी आहेत.
अमित गोरखे यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1980 रोजी झाला आहे.
अमित गोरखे हे अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष देखील आहेत.
मातंग समाजाचे महाराष्ट्राचे उच्चशिक्षित युवा नेतृत्व देखील त्यांच्या खांद्यावर आहे.
गोरखे यांचे एम ए (सोशॉलॉजी), एमबीए (एच आर) पर्यंतचे उच्च शिक्षण पुर्ण झाले आहे.
हे ही वाचा : पंकजा मुंडे आमदार होणार, भाजपने 'या' 5 नेत्यांना दिली उमेदवारी
पिंपरी चिंचवड क्षेत्रात नोव्हेल शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून शैक्षणिक क्षेत्रात भरघोस काम त्यांनी केले आहे.
अनुसूचित जातीतील शैक्षणिक कार्यासाठी त्यांना 2014 साली राष्ट्रपतींच्या हस्ते भारत सरकारचा राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
अमित गोरखे यांची लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी नाळ जोडली गेली होती.
अमित गोरखे यांचा न्यूज पेपर विक्रेता ते विधान परिषद सदस्य पद असा प्रवास आहे.
अत्यंत गरिबीतून उभे राहिलेले दलित समाजाचे युवा नेतृत्व आहेत.
गोरखे यांच्यावर भाजपाकडून प्रदेश सचिव तसेच पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अशी सध्याची जबाबदारी आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील कार्यकर्ता म्हणून गोरखे यांना ओळखले जाते.
अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या गैरव्यवहारानंतर चार महिन्याच्या कालावधीमध्ये महामंडळ स्थिरस्थावर करण्याचे काम त्यांनी केले होते.
हे ही वाचा : Sunil Raut : "मी इथे राजीनामा देतो", सुनील राऊत-नितेश राणे विधानसभेत भिडले
'या' 5 नेत्यांना मिळाली उमेदवारी
भाजपने विधान परिषदेसाठी 10 नावे केंद्राला पाठवली होती. यामध्ये पंकजा मुंडे,अमित गोरखे, परिणय फुके, सुधाकर कोहळे, योगेश टिळेकर, निलय नाईक, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, चित्रा वाघ, माधवीताई नाईक आणि मित्र पक्ष महादेव जानकर यांची नावे होती. या नेत्यांमधून पंकजा मुंडे आणि महादेव जानकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. यापैकी पंकजा मुंडे यांनी उमेदवारी जाहीर झाली आहे. आणि सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे या चार नेत्यांना देखील भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT