Vidhan Parishad Election Result 2024 : विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या चार जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीचे निकाल अखेर जाहीर झाले आहेत. तीन मतदारसंघाचे निकाल सोमवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आले, तर नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी मंगळवारी सकाळीपर्यंत चालली आणि निकाल जाहीर करण्यात आला. चारपैकी दोन जागा महायुतीने जिंकल्या आहेत, तर महाविकास आघाडीला दोन जागा मिळाल्या आहेत. (Uddhav Thackeray's Shiv Sena has won the Mumbai Graduate and Mumbai Teacher constituencies)
ADVERTISEMENT
मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षण अशा विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक पार पडली आणि निकाल जाहीर झाले आहेत.
मुंबईत पुन्हा ठाकरेंचे वर्चस्व
मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर या दोन्ही जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जिंकल्या आहेत. मुंबई पदवीधरमधून अनिल परब हे विजयी झाले.
हेही वाचा >> 'भ@ माझ्याकडे हात...', अंबादास दानवेंची भाजप आमदार प्रसाद लाडांना भर सभागृहात शिवीगाळ
मुंबई शिक्षक मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे ज.मो. अभ्यंकर हे विजयी झाले. या दोन्ही मतदारसंघात भाजपने उमेदवार उतरवले होते. अनिल परब यांच्याविरोधात भाजपचे किरण शेलार हे निवडणूक लढवत होते. तर ज.मो. अभ्यंकर यांच्याविरोधात शिवनाथ दराडे यांन उमेदवारी दिली होती.
विजयी उमेदवार
मुंबई पदवीधर -अनिल परब - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
मुंबई शिक्षक - ज.मो. अभ्यंकर - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
कोकण पदवीधर - निरंजन डावखरे - भाजप
नाशिक शिक्षण - किशोर दराडे - शिवसेना
MLC Election Results 2024 : कुणाला किती मिळाली मते?
कोकण पदवीधर मतदारसंघातून विजयी झालेल्या भाजपच्या निरंजन डावखरे यांना 1 लाख 719 मते मिळाली. तर काँग्रेसच्या रमेश कीर यांना 28 हजार 585 इतकीच मते मिळाली.
हेही वाचा >> गणित विधानसभेचं: कोकण कोणाचं?, राणेंना ठाकरेंचं तगडं आव्हान
मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेनेचे (UBT) अनिल परब यांना 44 हजार 784 मते मिळाली. तर भाजपच्या किरण शेलार यांना 18 हजार 772 इतकी मते मिळाली. मुंबई शिक्षक मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर हे 4 हजार 83 इतकी मते घेऊन विजयी झाले.
हेही वाचा >> पंकजा मुंडे आमदार होणार, भाजपने 'या' 5 नेत्यांना दिली उमेदवारी
दरम्यान, नाशिक शिक्षक मतदारसंघातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे किशोर दराडे हे विजयी झाले असून, मतांची आकडेवारी अद्याप मिळालेली नाही. नाशिक शिक्षक मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे संदीप गुळवे हे निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र ठाकरेंना या मतदारसंघात झटका बसला.
ADVERTISEMENT