Uddhav Thackeray : मराठ्यांना 'ओबीसी'तून आरक्षण द्यावं का? ठाकरे म्हणाले, "मोदींनी निर्णय..."

मुंबई तक

30 Jul 2024 (अपडेटेड: 30 Jul 2024, 03:04 PM)

Uddhav Thackeray Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलकांनी मातोश्री बाहेर आंदोलन केले. उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडली. 

उद्धव ठाकरे

शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

उद्धव ठाकरेंचे मराठा आरक्षणावर भाष्य

point

ठाकरेंनी मोदींच्या कोर्टात ढकलला चेंडू

point

मराठा-ओबीसी संघर्षावर ठाकरे काय बोलले?

Uddhav Thackeray on Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी तीव्र झाली आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेची या मागणीबद्दल भूमिका काय आहे, याबद्दल मराठा आरक्षण आंदोलकांनी मातोश्री बाहेर आंदोलन केले. या आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंनी त्यांची भूमिका मांडली. (What is uddhav Thackeray Stand on Maratha reservation)

हे वाचलं का?

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यायला हवे का? असा विचारण्यात आला. 

उद्धव ठाकरे मराठा आरक्षणाबद्दल काय म्हणाले?

"मी याबद्दल संभाजीनगरला गेलो होतो, तिथे भूमिका स्पष्ट केलेली आहे. मधल्या काळात सरकारने एक राजकीय नाटक करण्याचा प्रयत्न केला होता. सर्व राजकीय नेत्यांना बोलवून तुमचं काय म्हणणं आहे? आजपर्यंत आम्ही आमचं म्हणणं मांडलेलं आहे", असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >> दाऊद शेखने यशश्रीची का केली हत्या? पोलिसांकडून मोठा खुलासा 

ठाकरे पुढे म्हणाले, "मराठा आरक्षण विधेयक जेव्हा विधानसभेत मांडलं तेव्हा आम्ही सर्वांनी त्याला पाठिंबा दिला. आज सुद्धा माझं म्हणणं तेच आहे की, राजकारण्यांना बोलावण्यापेक्षा सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवावं. सर्वमान्य तोडगा काढावा. शिवसेनेचा त्याला पाठिंबा आहे." 

मराठा आंदोलकांना ठाकरेंनी काय दिला सल्ला?

"जे आंदोलक आले होते, माझी भूमिका विचारायला. त्यांना मी हेच सांगितले की, तुम्हाला एकमेकांत लढवून आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचं स्वप्न काही लोक बघत आहेत. मग त्यामध्ये भाजप असेल किंवा अन्य कुणी असेल. हे स्वप्न साकार होऊ देऊ नका. कारण आपण एका आईची लेकरं आहोत. महाराष्ट्राची लेकरं आहोत."

हेही वाचा >> "अजित पवार अमित शाहांना चोरून भेटायला का येत होते?", सुप्रिया सुळेंनी पकडले कात्रीत 

"आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा अधिकार हा राज्याला नाहीये. जसं बिहारमध्ये आरक्षण दिले होते, ते कोर्टाने उडवलं. मर्यादा वाढवायची असेल, तर लोकसभेमध्ये हा प्रश्न सुटू शकतो. मी माझे खासदार सोबत द्यायला तयार आहे. सर्वांनी मोदींकडे जावं."

"मोदी सुद्धा नेहमी सांगतात की मी मागास जाती जमातीचा. गरिबीतीला संघर्ष त्यांना चांगला माहिती आहे. याबाबतीत मोदी घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे. लोकसभेत सर्वमान्य तोडगा निघत असेल, तर मी त्याला पाठिंबा द्यायला तयार आहे. 

    follow whatsapp