Mood of the Nation Survey : 2024 मध्ये गुलाल उधळण्यासाठी भाजपप्रणित एनडीएने जोरात तयारी सुरू केलीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा काही मुद्दे अधोरेखित करताना दिसत आहे. भ्रष्टाचार, घराणेशाही यासारखे मुद्दे मोदींच्या भाषणात दिसून येत आहेत. पण, लोकांच्या मनात काय आहे, लोकांना कोणत्या मुद्द्यावर मतदान करायचं आहे, हे मूड ऑफ द नेशन मधून समोर आलंय. (During this survey people were asked why they would vote for BJP in 2024 elections?)
ADVERTISEMENT
पंतप्रधान मोदींनी 2024 सालची तयारी पूर्ण केली आहे. 2024 मध्ये जनता पुन्हा कोणत्या मुद्द्यावर भाजपला मतदान करेल असा प्रश्न निर्माण झाला आहे. निवडणुकीत मुद्दे महत्त्वाचे ठरतील की, लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावरच मतदान करणार? इंडिया टुडे सी-व्होटरने देशातील सर्व 543 लोकसभा मतदारसंघातील लोकांचा मूड जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केले. यामध्ये 25,951 जणांनी आपले मत मांडले.
Lok Sabha Election 2024 : कोणता मुद्दा भाजपला सर्वात जास्त मदत करेल?
लोकांनी प्रश्नावर त्यांची मतं मांडली. यात 33 टक्के लोकांनी सांगितले की ते भारताला जगातील क्रमांक 3 ची अर्थव्यवस्था बनवण्याच्या पंतप्रधान मोदींच्या आश्वासनावर मतदान करतील. त्याचवेळी 17 टक्के लोकांनी राम मंदिराचा मुद्दा सर्वात मोठा मानला आहे. दुसरीकडे, 12 टक्के लोकांनी यूसीसी लागू करण्याच्या भाजपच्या आश्वासनाला महत्त्वाचा मुद्दा मानला आहे.
वाचा >> Mood of the Nation: मविआ फोडली, पण महाराष्ट्रात भाजपला फक्त…
2024 मध्ये भाजपला मत का देणार?
या सर्वेक्षणादरम्यान लोकांना विचारण्यात आले की ते 2024 च्या निवडणुकीत त्यांना भाजपला मतदान का करायचं आहे? यावर 44 टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, हेच सर्वात मोठे कारण सांगितले. 22 टक्के लोकांनी विकास हा मुद्दा असल्याचे सांगितले. त्याचबरोबर देशात झालेल्या विकासासाठी पुन्हा भाजपला मतदान करणार असल्याचे म्हटले आहे. याशिवाय 14 टक्के लोक भाजपच्या हिंदुत्व प्रतिमेने प्रभावित झाले असून यामुळे ते पुन्हा भाजपला मतदान करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
2024 मध्ये कोणता मुद्दा भाजपला सर्वात जास्त मदत करेल?
भारताला नंबर 3 अर्थव्यवस्था बनवण्याची पंतप्रधानांची हमी > 33%
राम मंदिर > 17%
UCC ची अंमलबजावणी > 12%
वाचा >> Mood of the Nation: नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार का?, देशातील जनतेचा काय आहे मूड?
2024 मध्ये भजपला मत का देणार?
पीएम मोदी > 44%
विकास > 22%
हिंदुत्व > 14%
ADVERTISEMENT