CP Radhakrishnan : कोण आहेत महाराष्ट्राचे नवे राज्यपाल राधाकृष्णन? 

मुंबई तक

28 Jul 2024 (अपडेटेड: 28 Jul 2024, 09:49 AM)

Maharashtra New Governor : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती केली आहे. 

सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत, त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे?

महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

follow google news

बातम्या हायलाइट

point

सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत?

point

महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांबद्दल महत्त्वाच्या गोष्टी

point

राधाकृष्णन यांची राजकीय कारकीर्द

Who is CP Radhakrishnan : महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सी.पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी (27 जुलै) राष्ट्रपती भवनाकडून राधाकृष्णन यांच्यासह इतर राज्यातील काही राज्यपालांच्या नियुक्तीचे प्रसिद्धपत्रक जारी करण्यात आले. (C.P. Radhakrishnan is new Governor of Maharashtra)

हे वाचलं का?

झारखंडचे राज्यपाल आणि तेलंगणाच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त प्रभार असलेल्या सी.पी. राधाकृष्णन यांच्यावर महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे 23 वे राज्यपाल आहेत. 

कोण आहेत सीपी राधाकृष्णन? 

महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलेले सी.पी. राधाकृष्णन यापूर्वी झारखंडचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. राज्यपाल म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी ते तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्षही होते.

हेही वाचा >> टेन्शन आल्यावर शरद पवार काय करतात, पहिल्यांदाच केला खुलासा 

राधाकृष्णन हे दक्षिण भारतातील भाजपच्या वरिष्ठ आणि सन्मानित नेत्यांपैकी एक आहेत. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. केरळचे प्रभारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. 

राधाकृष्णन दोन वेळा होते लोकसभा खासदार

सीपी राधाकृष्णन हे मूळचे तामिळनाडूचे आहेत. 20 ऑक्टोबर 1957 रोजी तामिळनाडूतील तिरुपूर जिल्ह्यात राधाकृष्णन यांचा जन्म झाला. वयाच्या 16व्या वर्षी म्हणजे साल 1973 मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण व्हीओसी कॉलेजमध्ये झाले.  

शेतकरी कुटुंबात जन्मलेले सी पी राधाकृष्णन पुढे जनसंघात सक्रीय झाले आणि राजकारणात आले. 1998 मध्ये कोईम्बतूरमध्ये बॉम्बस्फोट झाले. त्यानंतर दोन वेळा ते कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले.

व्हिडीओ बघा >> खासदार-आमदाराच्या चालकांमध्ये हाणामारी, एकमेकांना बेल्टने... 

1998 मध्ये त्यांनी दीड लाखांहून अधिक मताधिक्य घेत विजय मिळवला. 1999 मध्ये 55 हजार मताधिक्य घेत ते विजयी झाले होते. 

दक्षिण भारतामध्ये भाजपचा विस्तार करण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा आहे.तामिळनाडू आणि केरळसह दक्षिण भारतातील इतर राज्यांत त्यांनी पक्षबांधणीचे काम केले. पाच दशकांपासून ते राजकारणात आहेत. 

    follow whatsapp