Why Milind Deora join Shinde Group not bjp : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे निकटवर्तीय मानले जाणारे मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात प्रवेश केला आहे. मात्र शिंदे गटात प्रवेश करण्यापूर्वी मिलिंद देवरा यांच्यासमोर राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या बलाढ्य भाजप पक्षातही प्रवेश करता आला असता. त्यामुळे देवरा यांनी भाजपचा पर्याय का निवडला नाही? आणि शिंदे गटातच का प्रवेश केला? या मागची रणनीती आणि इनसाईड स्टोरी काय आहे? हे जाणून घेऊयात. (why milind deora join eknath shinde shivsena not bjp mumbai south seat rahul gandhi udhhav thackeray)
ADVERTISEMENT
मिलिंद देवरा यांच्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर सोशल मीडियावर राहुल गांधी यांचा एक जुना फोटो व्हायरल झाला होता. या फोटोत राहुल गांधीसोबत, मिलिंद देवरा, ज्योतिरादित्य सिंधिया, आरपीएन सिंह, जितिन प्रसाद आणि सचिन पायलट हे नेते दिसत आहेत. या फोटोमधील सचिन पायलट यांना वगळता सर्वच नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. विशेष म्हणजे या फोटोमधील मिलिंद देवरा यांना वगळता इतर सर्व नेत्यांनी भाजपातही प्रवेश केला आहे. ज्योतिरादित्य सिंधिया, आरपीएन सिंग आणि जितिन प्रसाद या काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला होता.आतापर्यंत वरील संदर्भाप्रमाणे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय राहिलेल्या सर्वच नेत्यांनी भाजपच कमळ हाती घेतले आहे. मिलिंद देवरा हे एकमेव नेते आहेत जे भाजपात प्रवेश न करता शिंदे गटात गेले आहे. त्यामुळे यामागचं राजकीय समीकरण काय आहे? हे जाणून घेऊयात.
हे ही वाचा : Asim Sarode : नार्वेकरांच्या निकालाची चिरफाड करणारे अॅड. असीम सरोदे कोण?
दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघातून मिलिंद देवरा यांनी चार वेळा निवडणूक लढवली होती. यामध्ये 2004 आणि 2009 मध्ये देवरा यांनी दक्षिण मुंबई लोकसभेची जागा जिंकली होती. तर 2014 आणि 2019 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे हा पराभव त्यांना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात झाला होता. त्यात सध्याची परिस्थिती पाहता महाविकास आघाडीत दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाची जागा ही वाटाघाटीत ठाकरे गटालाच जाणार होती. त्यामुळे आपसूकच मिलिंद देवरा इच्छूक असून देखील त्यांचा पत्ता कट होणार हे निश्चित होते. त्यात दक्षिण मुंबई लोकसभेच्या जागेबाबत देवरा यांनी राहुल गांधींशी बोलण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र यातून काहीच मार्ग निघाला नसल्याने त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती.
खरं तर देवरा यांना पुन्हा संसदेत जाण्यात रस आहे, त्यामुळेच त्यांनी पक्ष बदलला आहे. आणि या गोष्टी काँग्रेसमध्ये राहुन शक्य नव्हत्या. कारण महाविकास आघाडीच्या जागावाटपात ठाकरेंना ही जागा जाणार होती. आता त्याच जागेवरून जर निवडणूक लढवायची झाल्यात त्यांच्यासमोर शिंदे गटाचा पर्याय होता. कारण महायुतीच्या जागावाटपात ही जागा शिंदे गटाला मिळण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे मिलिंद देवरा यांनी भाजपचा पर्याय न निवडता थेट शिंदे गटात प्रवेश केला आहे.
शिंदे गटाची ताकद वाढणार
शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हा महाराष्ट्रातील एकमेव असा पक्ष आहे जो इंग्रजी भाषिक मिलिंद देवरा यांच्या कौशल्याचा वापर करून भारतातील व्यापारी समुदायामध्ये चांगले संबंध ठेवू शकतो. मुकेश अंबानी यांनी 2019 मध्ये मिलिंद देवरा यांच्या मोहिमेला पाठिंबा देणे हे देवरा कुटुंबाचे उद्योगपतींशी असलेल्या संबंधांची साक्ष होती, असे उदय सामंत यांनी सांगितले. त्यामुळेच शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत मिलिंद देवरा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये दिसले आहेत.
हे ही वाचा : Ranbir Kapoor च्या ‘रामायण’मध्ये शूर्पणखेच्या भूमिकेत दिसणार सेक्रेड गेमची ‘ही’ अभिनेत्री?
मिलिंद देवरा त्यांच्या वैयक्तिक खर्चाने दावोसमध्ये आहेत आणि त्यांचे दिवंगत वडील मुरली देवरा यांच्यामुळे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. यावरून शिंदे यांच्या शिवसेनेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पक्षाचे प्रतिनिधित्व करू शकेल अशा नेत्याची गरज होती,असे देखील उदय सामंत यांनी सांगितले.
ADVERTISEMENT