Sharad Pawar On Z Plus Security: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्याबाबत केंद्रीय राखीव पोलीस दलाला (CRPF) निर्देश दिले आहेत. या सुरक्षेसाठी सीआरपीएफच्या ५५ सशस्त्र कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आलं आहे. परंतु, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा का देण्यात आलीय? असा सवाल राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे. (why z plus security given to ncp chief sharad pawar before maharashtra vidhansabha election 2024)
ADVERTISEMENT
या सुरक्षेबाबत प्रतिक्रिया देतान शरद पवारांनी शंका उपस्थित केली आहे. "काल माझ्याकडे गृहखात्याचे अधिकारी आले होते. कदाचित निवडणुका आहेत. झेड प्लस सेक्युरिटी म्हणजे अधिकृत माहिती मिळवण्याची व्यवस्था असू शकते. नक्की काय आहे मला माहित नाही", अंस पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले.
'झे प्लस' सुरक्षेबाबत शरद पवार काय म्हणाले?
"काल माझ्याकडे गृहखात्याचे अधिकारी आले होते. कदाचित निवडणुका आहेत. झेड प्लस सेक्युरिटी म्हणजे अधिकृत माहिती मिळवण्याची व्यवस्था असू शकते. नक्की काय आहे मला माहित नाही. देशात तीन लोकांच्या संबंधीचा निर्णय घेतला आहे. आरएसएचे प्रमुख भागवत त्यांचंही नाव सांगितलं. देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि मला झेड प्लस सेक्युरिटी दिली आहे". शरद पवारांना धमकी दिल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय यंत्रणांनी ही सुरक्षा दिलं असल्याचं सांगितलं जात आहे. तसच केंद्र सरकारने पवारांना व्हीआयपी सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा >> Maharashtra Breaking News : हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आज कोल्हापूर बंदची हाक
झेड प्लस सुरक्षेबाबत माहितीय का?
सुरक्षेच्या येलो बुकनुसार शरद पवारांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. पवारांना दिलेल्या सुरक्षेत ५८ कमांडो तैनात असतील, अशी माहिती आहे. झेड प्लस कॅटगरिच्या सुरक्षेत १० आर्म्ड स्टॅटिक गार्ड, 6 PSO (एकाच वेळी राउंड द क्लॉक), २ जवान (एस्कॉर्टमध्ये राउंड द क्लॉक), ५ पहारेकरी (दोन शिफ्ट मध्ये राहतात). एक पोलीस निरीक्षक किंवा पोलीस उप निरीक्षक इंचार्ज म्हणून तैनात असतात. व्हीआयपींच्या घरी येजा करणाऱ्या लोकांसाठी ६ फ्रिस्किंग आणि स्क्रीनिंग करणारे तैनात असता. तसच राउंड द क्लॉक ट्रेंड ६ ड्रायव्हर असतात.
झेड दर्जाची सुरक्षा
झेड दर्जाच्या सुरक्षेत एकूण ३३ सुरक्षा रक्षक तैनात केले जातात. आर्म्ड फोर्सचे १० आर्म्ड स्टॅटिक गार्ड व्हीआयपीच्या घरी राहतात. ६ राउंड द क्लॉक पीएसओ, १२ आर्म स्कॉर्टचे कमांडो, २ पहारेकरी आणि ३ ट्रेंड ड्रायव्हर राउंड द क्लॉकमध्ये असतात.
हे ही वाचा >> Petrol Pump Scam: सावधान! पेट्रोल पंपावर होणारी फसवणूक अशी टाळा; 'इथे' चुकलात तर बसेल मोठा फटका
वाय प्लस दर्जाची सुरक्षा
या सुरक्षेत आर्म्ड पोलिसांचे ११ कमांडो तैनात करण्यात येतात. ज्यामध्ये पोलिसांचे ५८ स्टॅटिक जवान व्हीयआपीच्या सुरक्षेसाठी त्यांच्या घरी आणि आसपास असतात. तसच ६ पीएसओ तीन शिफ्टमध्ये सुरक्षा देतात.
वाय दर्जाची सुरक्षा
ज्यांना धोका कमी असतो, अशा व्यक्तींना ही सुरक्षा दिली जाते. यामध्ये एकूण ८ सुरक्षारक्षकांचा समावेश असतो. ज्या व्हीआयपीला सुरक्षा दिली जाते, त्यांच्या घरी पाच आर्म्ड गार्ड सुरक्षेसाठी दिले जातात. तसच तीन पीएसओ तीन शिफ्टमध्ये सुरक्षा देतात.
ADVERTISEMENT