wrestlers protest latest news, MP pritam munde : दिल्लीत भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात पदक विजेत्या कुस्तीपटूंनी आंदोलन छेडलं आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केलेले आहेत. हे प्रकरण दिवसेंदिवस संवेदनशील बनत चाललं असून, या मुद्द्यावरून भाजपच्या बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. सत्य बाहेर यायला हवं होतं, असं म्हणत खासदार मुंडे यांनी भूमिक मांडली आहे. (beed mp pritam munde reaction on wrestlers protest)
ADVERTISEMENT
ब्रिजभूषण शरण सिंह यांनी लैंगिक शोषण केले असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी फोगाट भगिनी, साक्षी मलिक यांच्यासह काही आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या कुस्तीपटूंनी आंदोलन सुरू केलं आहे. 28 मे रोजी दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंना ताब्यात घेताना फरफटत नेल्यानं तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या सगळ्या प्रकारावरून विरोधकांनीही मोदी सरकारला खडेबोल सुनावले आहेत. त्यानंतर आता भाजप खासदार प्रीतम मुंडेंनी आपल्याच सरकारला आहेर दिला आहे.
प्रीतम मुंडे कुस्तीपटूंच्या आंदोलनावरून काय म्हणाल्या?
बीड शहरात आयोजित पत्रकार परिषदेत प्रीतम मुंडे या मुद्द्यावर बोलल्या. “केवळ खासदारच नाही, तर एक महिला म्हणूनही मला त्या महिला खेळाडूंबद्दल आस्था आहे. असे आरोप जेव्हा होतात, तेव्हा त्याची वेळेवर चौकशी व्हायला हवी होती. यातील सत्य समोर यायला हवे होते”, असं म्हणत प्रीतम मुंडे यांनी भूमिका मांडली.
हेही वाचा >> Wrestlers Protest News : आंदोलनाची धग सचिन तेंडुलकरच्या दारापर्यंत!
“सरकारकडून त्या महिला खेळाडूंशी संवाद साधायला कोणी गेले नाही. ते व्हायला हवे होते. त्या प्रकरणात योग्य ती कारवाई व्हायला हवी”, अशा शब्दात प्रीतम मुंडेंनी सुनावलं आहे. एका भाजप खासदारांनी सरकारला सुनावलेल्या बोलांची आता चर्चा सुरू झाली आहे.
‘तगडी फाईट असेल तर लढायलाही आनंद वाटतो’, प्रीतम मुंडे काय म्हणाल्या?
बीड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. या चर्चेवर बोलताना प्रीतम मुंडे म्हणाल्या, “माझ्यासमोर विरोधी पक्षाला उमेदवार मिळत नाही. मी डॉन तर नाही, ‘मै गुंडी तो नहीं हू ना”, म्हणत प्रीतम मुंडे यांनी विरोधकांची खिल्ली उडवली. (maharashtra political news in marathi)
हेही वाचा >> Maharashtra Politics : शिंदेंच्या खासदाराची ‘ही’ मागणी शिवसेना-भाजप सरकारचं टेन्शन वाढवणार?
“धनंजय मुंडे यांना पक्षाने आदेश दिला आणि त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली तरीही काही फरक पडणार नाही. राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच लढत राहिली आहे. लोकसभेसाठी विरोधी उमेदवार हा चांगला असावा. आपल्याला प्रेरणा मिळते. राष्ट्रवादीला अजून उमेदवार निश्चित करता आला नाही. त्यामुळे लोकसभेची निवडणूक अर्धी आपण जिंकलेली आहे. तगडी फाईट होईल असा उमेदवार मिळाला, तर मला आनंद वाटायला हवा. पण मला आनंद वाटत नाही. त्यांना पक्षाने आदेश दिला आणि त्यांनी समोर लढवायच ठरवलं तर काही नाही”, असं म्हणत प्रीतम मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना आव्हान दिले.
ADVERTISEMENT