होम ग्राऊंडवर चमकला अक्षर पटेल, इंग्लंडच्या डाव गुंडाळला

मुंबई तक

• 03:52 PM • 24 Feb 2021

घरच्या मैदानावर खेळणाऱ्या अक्षर पटेलने इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये आपला डंका वाजवला आहे. मोटेराच्या पिचवर अक्षरने इंग्लंडला आपल्या जाळ्यात अडकवत ६ विकेट घेतल्या. अक्षरच्या या कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लंडला पहिल्या इनिंगमध्ये ११२ रन्सवर रोखलं. २१.४ ओव्हर्समध्ये ३८ रन्स देत अक्षरने पुन्हा एकदा आपलं महत्व सिद्ध केलं. डे-नाईट टेस्ट मॅचच्या इतिहासात अक्षर पटेलने टीम इंडियाकडून […]

Mumbaitak
follow google news

घरच्या मैदानावर खेळणाऱ्या अक्षर पटेलने इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये आपला डंका वाजवला आहे. मोटेराच्या पिचवर अक्षरने इंग्लंडला आपल्या जाळ्यात अडकवत ६ विकेट घेतल्या. अक्षरच्या या कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लंडला पहिल्या इनिंगमध्ये ११२ रन्सवर रोखलं. २१.४ ओव्हर्समध्ये ३८ रन्स देत अक्षरने पुन्हा एकदा आपलं महत्व सिद्ध केलं.

हे वाचलं का?

डे-नाईट टेस्ट मॅचच्या इतिहासात अक्षर पटेलने टीम इंडियाकडून बॉलिंगमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

याचसोबत आपल्या पहिल्या दोन टेस्ट मॅचमध्ये अक्षर पटेलने ५ विकेट घेण्याचा विक्रम केला. अक्षर पटेलआधी मोहम्मद निसार आणि नरेंद्र हिरवाणी या दोन भारतीय खेळाडूंनी अशी कामगिरी करुन दाखवली होती.

अक्षर पटेलला रविचंद्रन आश्विनने ३ विकेट्स घेत चांगली साथ दिली. इंग्लंडकडून झॅक क्रॉलीने हाफ सेंच्युरी झळकावत एकाकी झुंज दिली. परंतू दुर्दैवाने इंग्लंडचा इतर कोणताही बॅट्समन अक्षर पटेलचा सामना करु शकला नाही.

    follow whatsapp