१८ तारखेपासून न्यूझीलंडसोबत खेळवल्या जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपसाठी भारतीय संघाने आज १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ज्यात युवा शुबमन गिलला रोहित शर्मासोबत सलामीला येण्याची संधी मिळणार आहे. याव्यतिरीक्त भारतीय संघात रविचंद्रन आश्विन आणि रविंद्र जाडेजा या दोन्ही अनुभवी खेळाडूंना स्थान मिळालं आहे.
ADVERTISEMENT
असा असेल भारताचा १५ सदस्यीय संघ –
रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे (व्हाईस कॅप्टन), हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकिपर), वृद्धीमान साहा (विकेटकिपर), रविचंद्रन आश्विन, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज
दरम्यान, आयसीसीने या स्पर्धेसाठी बक्षीसाची रक्कम जाहीर केली असून विजेत्या संघाला १२ कोटींच्या घरात रक्कम आणि मानाची गदा मिळणार आहे. ICC ने याबद्दल अधिकृत पत्रक काढून माहिती दिली. पराभूत संघाला आयसीसीकडून ५ कोटींच्या घरात रक्कम मिळणार असून तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या संघाला ३ कोटींच्या घरात रक्कम बक्षीस म्हणून मिळणार आहे. चौथ्या क्रमांकावर आलेल्या संघाला २ कोटी तर उर्वरित संघांना आयसीसी ७३ लाखांच्या घरात बक्षीस देणार आहे.
WTC Final : विराट विरुद्ध विल्यमसन, आतापर्यंतच्या करिअरमध्ये कोणाची आकडेवारी सरस?
ADVERTISEMENT