IPL संपताच टीम इंडिया खेळणार सर्वात मोठी क्रिकेट टूर्नामेंट? जय शाहांनी दिली मोठी अपडेट

मुंबई तक

15 Aug 2024 (अपडेटेड: 15 Aug 2024, 05:26 PM)

Jay Shah On IPL, WTC Final : आयपीएलचा हंगाम संपताच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चा फायनलचा सामना रंगणार आहे. लॉर्ड्सच्या मैदानात हा सामना खेळवला जाणार आहे. तत्पूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाहा यांनी माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

Jay Shah

WTC Final Update

follow google news

बातम्या हायलाइट

point

जय शाहांनी टीम इंडियाच्या शेड्युलबाबत दिली मोठी अपडेट

point

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्याआधी खेळाडूंना मिळणार विश्रांती

point

"आयपीएल आणि डब्लूटीसी फायनलमध्ये १५ दिवसांचं अंतर"

Jay Shah On IPL, WTC Final : आयपीएलचा हंगाम संपताच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चा फायनलचा सामना रंगणार आहे. लॉर्ड्सच्या मैदानात हा सामना खेळवला जाणार आहे. तत्पूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाहा यांनी माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिली आहे."फायनल सामन्याआधी खेळाडूंना विश्रांती मिळावी, जेणेकरून त्यांच्यावद अधिक ताण येणार नाही. आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्याच्या आयोजनात १५ दिवसांचं अंतर राहील, असं शाहा यांनी म्हटलं आहे. 

हे वाचलं का?

२०२१ आणि २०२३ मध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दोन्ही फायनल सामन्यांमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना पत्करावा लागला. आयपीएलनंतर लगेच या टूर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळे भारताच्या खेळाडूंना विश्रांती मिळाली नाही, असं बोललं जात होतं. याच पार्श्वभूमीवर जय शाहांनी म्हटलंय की, या सर्व बाबी असतानाही भारतीय संघ दोन्ही वेळा फायनलमध्ये प्रवेश करण्यात यशस्वी ठरला.

हे ही वाचा >>Ajit Pawar: महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी बातमी, अजितदादा मुलासाठी बारामती विधानसभा सोडणार?

"आयपीएल आणि डब्लूटीसी फायनलमध्ये १५ दिवसांचं अंतर"

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर टीम इंडियावर टीकेचा सामना करावा लागला होता. त्यानंतर पुढील योजनांबाबत जय शाहा यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हटलं, भविष्यातील योजनांना विचार करून निर्णय घेण्यात आला आहे की, यापुढे आयपीएल सामने आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्याच्या आयोजनात १५ दिवसांचं अंतर राहिल. भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये दोनदा प्रवेश केला, याचं आपण कौतुक केलं पाहिजे.

हे ही वाचा >> Kolkata Crime : कोलकाताच्या अत्याचाराच्या घटनेनंतर 'ती' पोस्ट व्हायरल! सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला नेटकऱ्यांनी सुनावलं

    follow whatsapp