IPL ऑक्शनआधी अर्जुन तेंडुलकर चमकला, एका ओव्हरमध्ये मारल्या ५ सिक्स

मुंबई तक

• 07:12 AM • 15 Feb 2021

आयपीएलच्या आगामी सिझनचं ऑक्शन १८ तारखेला चेन्नईत पार पडणार आहे. या सिझनसाठी २९७ प्लेअर्सचं नाव शॉर्टलिस्ट करण्यात आलं असून यामध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनलाही संधी मिळाली आहे. २० लाख ही अर्जुनची बेस प्राईज असणार आहे. मुंबईकडून सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत एक मॅच खेळल्यानंतर अर्जुन आयपीएल ऑक्शनसाठी पात्र ठरला. आयपीएल ऑक्शनसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना […]

Mumbaitak
follow google news

आयपीएलच्या आगामी सिझनचं ऑक्शन १८ तारखेला चेन्नईत पार पडणार आहे. या सिझनसाठी २९७ प्लेअर्सचं नाव शॉर्टलिस्ट करण्यात आलं असून यामध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनलाही संधी मिळाली आहे. २० लाख ही अर्जुनची बेस प्राईज असणार आहे. मुंबईकडून सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत एक मॅच खेळल्यानंतर अर्जुन आयपीएल ऑक्शनसाठी पात्र ठरला.

हे वाचलं का?

आयपीएल ऑक्शनसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना अर्जुनने आपली चमक दाखवली आहे. MIG क्रिकेट क्लबकडून खेळताना अर्जुन तेंडुलकरने ३१ बॉलमध्ये ७७ रन्स करुन ३ महत्वाच्या विकेट्सही घेतल्या. आपल्या इनिंगमध्ये अर्जुनने ५ फोर आणि ८ सिक्स लगावल्या. यातल्या ५ सिक्स या एकाच ओव्हरमध्ये लगावल्या. अर्जुन आणि संघातील इतर प्लेअर्सनी केलेल्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर MIG Cricket Club ने ३८५ रन्सपर्यंत मजल मारली.

प्रत्युत्तरादाखल इस्लाम जिमखान्याचा संघ १९१ रन्सपर्यंत मजल मारु शकला. अर्जुननेही ३ विकेट्स घेऊन आपल्या संघाच्या विजयाच मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे अर्जुनच्या या कामगिरीचा आयपीएल ऑक्शनसाठी त्याला फायदाच होणार आहे. आयपीएल २०२१ चं आयोजन बीसीसीआय भारतामध्येच करण्याच्या तयारीत आहे.

    follow whatsapp