Tokyo Olympic 2021 : Bajrang Puniya भारताला पदक मिळवून देण्यात यशस्वी होईल?

मुंबई तक

• 07:29 AM • 12 Jul 2021

जपानच्या टोकियो शहरात सुरु होणारी ऑलिम्पिक स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. कुस्ती, नेमबाजी, तिरंदाजी, अॅथलेटिक्स यासारख्या प्रकारांमधून भारताला यंदा पदकाची आशा कायम आहे. कुस्तीत यंदा भारताला बजरंग पुनियाकडून पदकाची आशा आहे. सुशील कुमार आणि योगेश्वर दत्त नंतर बजरंग पुनिया हा भारताचा आताच्या घडीचा सर्वोत्तम कुस्तीपटू मानला जातो. २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने कुस्तीत अखेरचं […]

Mumbaitak
follow google news

जपानच्या टोकियो शहरात सुरु होणारी ऑलिम्पिक स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. कुस्ती, नेमबाजी, तिरंदाजी, अॅथलेटिक्स यासारख्या प्रकारांमधून भारताला यंदा पदकाची आशा कायम आहे. कुस्तीत यंदा भारताला बजरंग पुनियाकडून पदकाची आशा आहे. सुशील कुमार आणि योगेश्वर दत्त नंतर बजरंग पुनिया हा भारताचा आताच्या घडीचा सर्वोत्तम कुस्तीपटू मानला जातो.

हे वाचलं का?

२०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने कुस्तीत अखेरचं पदक मिळवलं होतं. सुशील कुमारचं रौप्य तर योगेश्वर दत्तच्या ब्राँझ पदकानंतर भारताला ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत पदक मिळवता आलेली नाही. ९ वर्षांचा हा पदकाचा दुष्काळ संपवण्याची मोठी जबाबदारी आता बजरंग पुनियाच्या खांद्यावर असणार आहे. त्यामुळे बजरंग यंदा भारताला कुस्तीत पदक मिळवून देऊ शकेल का? कसा सुरु आहे त्याचा सराव याबद्दल आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत.

बजरंग पुनिया गेल्या काही महिन्यांपासून रशियात कुस्तीचा सराव करत आहे. Ali Aliev Memorial tournament मध्ये बजरंग सहभागी झाला होता. परंतू उपांत्य सामन्यात पायाला झालेल्या दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली. परंतू बजरंगचे कोच शाको बेंटींडीस यांनी बजरंग लवकरच पुनरागमन करेल अशी माहिती दिली होती.

बजरंग पुनिया हा मुळचा हरियाणातल्या झज्जरचा. आपले वडील बलवानसिंग पुनिया यांच्याकडून बजरंगने कुस्तीचे धडे घेतले. वयाच्या सातव्या वर्षापासून तो कुस्ती शिकतो आहे. २००३ सालापासून तो ‘साई’च्या केंद्रात (Sports Authority of India) सराव करायला लागला. २००५ साली बजरंगने राष्ट्रीय पातळीवर आपलं पहिलं विजेतेपद मिळवलं. यानंतर बजरंगचा प्रवास सुरुच होता. २०१५ साली त्याच्या या प्रवासाला पाठीच्या दुखापतीमुळे ब्रेक लागला. परंतू या दुखापतीमुळे त्याने दमदार पुनरागमन केलं.

Tokyo Olympic 2021 : जाणून घ्या भारताकडून आतापर्यंत कोणाला मिळालं टोकियोचं तिकीट?

२०१८ साली जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत बजरंगने रौप्य पदकाची कमाई केली. याच वर्षी बजरंगने कॉमनवेल्थ आणि एशिअन गेम्समध्ये सुवर्णपदक मिळवलं. ६५ किलो वजनी गटात बजरंग सध्या जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. गेल्या काही स्पर्धांमध्ये बजरंगने अनेक मातब्बल मल्लांचा सामना करुन त्यांना पराभवाचा धक्का दिलाय. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्याचा हाच अनुभव त्याला पदक मिळवण्यासाठी कामी येईल असा अंदाज व्यक्त केला जातोय.

२०१९ साली जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई करत बजरंग पुनियाने टोकियो ऑलिम्पिकचं पदक मिळवलं. बजरंग ज्या स्पर्धेत गेलाय तिकडे तो कधीच रिकाम्या हाताने परतला नाही, त्यामुळे यंदा तो ऑलिम्पिकचं पदकही मिळवेल असा त्याच्या घरच्यांना विश्वास आहे. त्यामुळे आतापर्यंतची बहारदार कामगिरी बजरंग टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुन्हा करतो का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Covid-19 च्या पार्श्वभूमीवर कसं असेल यंदाचं Tokyo Olympic? जाणून घ्या…

    follow whatsapp