भारतीय संघाचं टेंशन वाढलं, टीम दुखापतीनं हैराण; आणखी एक दिग्गज खेळाडू दुखापतग्रस्त

मुंबई तक

• 02:07 PM • 25 Sep 2022

टीम इंडिया हैदराबादमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसरा टी-20 सामना खेळत आहे. मालिकेत 1-1 अशा बरोबरीनंतर येथे विजय मिळवून इतिहास रचण्याची संधी आहे. पण या सामन्याव्यतिरिक्त टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू दीपक हुडाच्या पाठीला दुखापत झाली आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, दीपक हुडा रविवारी तिसऱ्या टी-20 सामन्यात निवडीसाठी पात्र नव्हता, त्यामुळे तो प्लेइंग-11 […]

Mumbaitak
follow google news

टीम इंडिया हैदराबादमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसरा टी-20 सामना खेळत आहे. मालिकेत 1-1 अशा बरोबरीनंतर येथे विजय मिळवून इतिहास रचण्याची संधी आहे. पण या सामन्याव्यतिरिक्त टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू दीपक हुडाच्या पाठीला दुखापत झाली आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, दीपक हुडा रविवारी तिसऱ्या टी-20 सामन्यात निवडीसाठी पात्र नव्हता, त्यामुळे तो प्लेइंग-11 मध्ये सहभागी होऊ शकला नाही. दीपक हुडाच्या पाठीला दुखापत झाल्याचे बोर्डाने म्हटले आहे.

हे वाचलं का?

तिसरा T-20 साठी भारतीय संघ: केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल

ही चिंतेची बाब आहे की दीपक हुड्डा देखील भारताच्या टी-20 विश्वचषक संघाचा एक भाग आहे. अशा परिस्थितीत ही दुखापत खूप गंभीर असेल तर टीम इंडियाला मोठा धक्का बसू शकतो. दीपक हुडाने अलीकडच्या काळात टी-20 मध्ये चांगली कामगिरी केली आहे, फलंदाजीसोबत तो संघासाठी दोन षटकेही टाकू शकतो.

टीम इंडिया दुखापतीने हैराण

टी-20 वर्ल्डकपला एक महिन्यापेक्षा कमी कालावधी असताना टीम इंडिया दुखापतीने हैराण झाली आहे. पहिला अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा गुडघ्याच्या दुखापतीमुळे मायदेशातील मालिका आणि टी-20 विश्वचषकातून बाहेर पडला. त्यानंतर मोहम्मद शमीला कोरोना झाला, त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया मालिकेत भाग घेऊ शकला नाही. टी-20 विश्वचषकासाठी राखीव खेळाडूमध्ये मोहम्मद शमीचा समावेश करण्यात आला आहे.

टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

स्टँडबाय खेळाडू: मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.

    follow whatsapp