IND vs AUS 1st Test : कांगारुंचं लोटांगण; भारताचा एक डाव अन् 132 धावांनी विजय

मुंबई तक

• 09:34 AM • 11 Feb 2023

Ind vs Aus 1st Test Day 3rd नागपूर : येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झालेल्या भारत (India) विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Australia) या पहिल्या कसोटी सामन्यात (Ind vs Aus 1st Test) भारताने मोठा विजय साकारला. भारताने १ डाव आणि १३२ धावांनी कांगारुंचा पराभव करत ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० आघाडी घेतली आहे. भारताने पहिल्या डावात २२३ धावांची […]

Mumbaitak
follow google news

Ind vs Aus 1st Test Day 3rd

हे वाचलं का?

नागपूर : येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झालेल्या भारत (India) विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Australia) या पहिल्या कसोटी सामन्यात (Ind vs Aus 1st Test) भारताने मोठा विजय साकारला. भारताने १ डाव आणि १३२ धावांनी कांगारुंचा पराभव करत ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० आघाडी घेतली आहे. भारताने पहिल्या डावात २२३ धावांची आघाडी घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव ९१ धावातच संपुष्टात आला. (India vs Australia 1st Test Day 3 | Cricket Score Update)

भारताकडून दुसऱ्या डावात अश्विनने ३७ धावात ५ विकेट्स घेतल्या. तर जडेज आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी दोन विकेट घेत विजयात मोलाचा वाटा उचलला. सामन्याच्या दोन्ही डावात मिळून अश्विनने ८ विकेट्स घेतल्या. तर जाडेजाने ७ विकेट्स आणि १ अर्धशतक झळकावतं अष्टपैलू कामगिरी केली.

Ind Vs Aus : जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते ऑस्ट्रेलियन टीम

तत्पूर्वी भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना कांगारूंचा पहिला डाव १७७ धावांत आटोपला. रविंद्र जाडेजाच्या ५ आणि अश्विनच्या ३ विकेट्सच्या बळावर भारताला ऑस्ट्रेलियाला कमी धावसंख्येवर रोखण्यास यश आलं. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारताकडून रोहित शर्माने शतक तर मधल्या फळीतील जाडेजा आणि तळातील अक्षर पटेल यांनी शानदार अर्धशतक झळकावली. त्यामुळे भारताने पहिल्या डावात ४०० धावांचा डोंगर उभारला आणि २२३ धावांची भक्कम आघाडी घेतली.

ऑस्ट्रेलियाकडून टॉड मर्फीने सर्वाधिक ७ विकेट्स घेतल्या. तर पॅट कमिन्सने २ विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने भारताला फलंदाजी करण्याची तसदी दिली नाही. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचे केवळ चार फलंदाज दुहेरी आकडी धावसंख्या गाठू शकले. कांगारुनी अवघी ३३ षटके खेळून काढली. भारताकडून दुसऱ्या डावात अश्विनने ५ विकेट्स घेतल्या तर रविंद्र जडेजाने त्याला विकेट्स घेत चांगली साथ दिली.

IND vs AUS 1st Test : जाडेजाला क्रीमची कृती महागात; मॅच संपताच ICC चा दणका

जाडेजाला क्रीमची कृती महागात; मॅच संपताच ICC चा दणका

दरम्यान, भारताच्या या मोठ्या विजयाच्या आनंदोत्सव साजरा होत असतानाच संघातील अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याला आयसीसीने शिक्षा ठोठावली आहे. सामन्यात पहिल्या दिवशी अंपायरच्या परवानगीशिवाय बोटावर क्रीम लावलं त्याला महागात पडलं आहे. जाडेजाला मॅच फीच्या २५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. यासोबतच त्याच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंटही जोडण्यात आला आहे. रवींद्र जडेजाला आयसीसीच्या लेव्हल-1 नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे.

    follow whatsapp