Mohammed Shami Adam Zampa : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यापैकी विश्वविजेतेपदावर कुणाचं नाव कोरलं जाईल, याचा निर्णय 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या विजेतेपदाच्या लढतीत जागतिक विजेतेपदाबरोबरच आणखी एका गोष्टीचा निकाल लागणार आहे; तो म्हणजे मोहम्मद शमी आणि अॅडम झम्पा यांच्यापैकी विकेट्सच्या शर्यतीत कोण बाजी मारणार याचा.
ADVERTISEMENT
भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याची ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज अॅडम झाम्पा यांच्याशी स्पर्धा आहे. शमीने 6 सामन्यात 23 विकेट घेतल्या आहेत. सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या शर्यतीत ऑस्ट्रेलियाचा अॅडम झाम्पा शमीनंतर दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 10 सामन्यात 22 विकेट घेतल्या आहेत. दोघांचाही अंतिम सामना आहे आणि त्यामुळेच शेवटच्या सामन्यात चुरशीची स्पर्धा बघायला मिळणार आहे.
हे ही वाचा >> IND vs AUS Final: 20 वर्षांपूर्वी एका चुकीमुळे हुकलं विजेतेपद, भारताचा का झाला होता पराभव?
सगळेच गोलंदाज शमीच्या खूप मागे
झाम्पाच्या तुलनेत शमीने या स्पर्धेत कमी सामने खेळले आहेत. पहिल्या चार सामन्यांमध्ये त्याला मैदानात येण्याची संधी मिळाली नाही. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यामुळे शमीने प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर त्याने जो कहर केला, तो सारे जग पाहत राहिले. त्याने अवघ्या 6 सामन्यात सगळ्या गोलंदाजांना मागे टाकत सर्वाधिक विकेट्स घेण्यात अव्वल स्थान पटकावलं.
हे ही वाचा >> Glenn Maxwell : वेदनेने कासावीस, तरीही खेळला; मॅक्सवेलने मोडला कपिल देव यांचा विक्रम
उपांत्य फेरीत घेतल्या ७ विकेट्स
6 सामन्यांपैकी शमीने 2 सामन्यात 5 बळी घेतले. एका सामन्यात 4 बळी, एका सामन्यात 2 बळी आणि न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य फेरीत 7 विकेट्स घेतल्या. त्याची सरासरी 9.13 आहे. अॅडम झाम्पा बद्दल बोलायचे झाले तर त्याने सलग तीन सामन्यात 4-4 विकेट घेतल्या. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य फेरीत तो चांगलाच महागात पडला. त्याने 55 धावा दिल्या आणि एकाही फलंदाजाला बाद करू शकला नाही.
ADVERTISEMENT