IPL 2025 च्या हंगामात मुंबई इंडियन्स (MI) ची कामगिरी काही विशेष राहिलेली नाही. पाचवेळचा चॅम्पियन राहिलेल्या मुंबईने यंदा चारपैकी तीन सामने गमावले आहेत. मुंबईला त्यांच्या शेवटच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सकडून (एलएसजी) 12 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. आता मुंबई इंडियन्स संघासाठी आनंदाची बातमी आली आहे.
ADVERTISEMENT
बुमराहबद्दल गूड-न्यूज...
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह येत्या दोन दिवसांत मुंबई इंडियन्सच्या संघात पुन्हा सामील होणार आहे. बुमराहला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) च्या वैद्यकीय संघाकडून फिटनेस मंजुरी मिळाली आहे. सूत्रांनी स्पोर्ट्स टुडेला दिलेल्या माहितीनुसार, बुमराह 7 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्समध्ये सामील होणार आहे. तसंच, तो RCB विरुद्धच्या सामन्यातह खेळण्याची शक्यता नाही.
हे ही वाचा >> ढसाढसा रडल्या, कागद-सह्या दाखवल्या, करूणा शर्मांनी धनंजय मुंडेंच्या कोणत्या 3 निकटवर्तीयांची नावं घेतली?
जसप्रीत बुमराह आयपीएलच्या चालू हंगामातील पहिल्या चार सामन्यांमधून बाहेर राहिला आहे. त्याला इंग्लंडविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या मायदेशातील मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधूनही बाहेर राहावं लागलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुमराहला मॅच-फिट घोषित करण्यापूर्वी काही मॅच सिम्युलेशन करावे लागेल. COE ने त्याला वैद्यकीय मंजुरी दिली आहे, पण मुंबई इंडियन्स व्यवस्थापन सिम्युलेशन गेम्स दरम्यान त्याच्यावर बारीक नजर ठेवणार आहे. त्यामुळेच त्याची आरसीबीविरुद्ध खेळण्याची शक्यता खूपच कमी आहे.
हे ही वाचा >> AI चं काम लय बेक्कार! सायबर गुन्हेगारांची लॉटरी लागणार? थेट PM मोदींचंच बोगस मतदान कार्ड बनवलं
जसप्रीत बुमराहला पाठीच्या खालच्या भागात दुखू लागल्याने जानेवारीपासून उपचार घेत होता. त्यानंतर आता बंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये बुमराहने त्याच्या गोलंदाजीचा भार वाढवला. परत येण्यापूर्वी तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे याची त्याला खात्री करायची होती म्हणून त्याने अनेक चाचण्या केल्या. 28 जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होणारी भारताची पाच कसोटी सामन्यांची मालिका डोळ्यासमोर ठेवून त्यानं जोरदार तयारी केली आहे.
ADVERTISEMENT
