IND vs BAN : पहिल्या T20 आधी टीम इंडियाला मोठा झटका, 'हा' खेळाडू संघातून OUT

मुंबई तक

05 Oct 2024 (अपडेटेड: 05 Oct 2024, 11:02 PM)

India vs Bangladesh T20 Series: भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. टी-20 मालिकेतील पहिला सामना 6 ऑक्टोबर (रविवार) रोजी ग्वाल्हेरमध्ये खेळवला जाणार आहे. टी-20 मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण शिवम दुबे मालिकेतून बाहेर पडला आहे.

 ind vs ban shivam dube ruled out of bangladesh t20 series tilak verma name as a replacement

भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

बांग्लादेशविरूद्ध टी20 मालिकेला उद्यापासून सूरूवात

point

टीम इंडियाला मोठा फटका

point

पहिल्याच सामन्याआधी हा खेळाडू बाहेर

India vs Bangladesh T20 Series: भारत आणि बांग्लादेश यांच्यातील तीन सामन्यांची टी20 मालिका 6 ऑक्टोबरपासून ग्वाल्हेरमध्ये सूरू होणार आहे.पण या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. कारण संघाचा स्टार खेळाडू शिवम दुबे हा या मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे आता निवड समितीने शिवम दुबेच्या जागी तिलक वर्माचा संघात समावेश केला आहे. (ind vs ban shivam dube ruled out of bangladesh t20 series tilak verma name as a replacement) 
 
भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. टी-20 मालिकेतील पहिला सामना 6 ऑक्टोबर (रविवार) रोजी ग्वाल्हेरमध्ये खेळवला जाणार आहे. टी-20 मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण शिवम दुबे मालिकेतून बाहेर पडला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे शिवम दुबे या मालिकेतून बाहेर गेला आहे. शिवम दुबेला ही दुखापत कधी आणि कशी झाली हे बीसीसीआयने सांगितले नाही. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Exit Poll Result : हरियाणा, काश्मीरात भाजप सत्तेबाहेर, महाराष्ट्रात काय होणार?

तिलक वर्माला मिळणार संधी 

बीसीसीआयच्या वरिष्ठ निवड समितीने शिवम दुबेच्या जागी डावखुरा फलंदाज तिलक वर्माचा संघात समावेश केला आहे. तिलक वर्मा रविवारी ग्वाल्हेरमध्ये खेळवल्या जाणाऱ्या सामन्यात खेळताना दिसणार आहे.  21 वर्षीय तिलक वर्माने भारतीय संघासाठी आतापर्यंत 4 वनडे आणि 21 टी-20 सामने खेळले आहेत.या कालावधीत, तिलक वर्माने एकदिवसीय सामन्यात 22.66 च्या सरासरीने 68 धावा आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 33.60 च्या सरासरीने 336 धावा केल्या आहेत. तिलक वर्माने आंतरराष्ट्रीय टी-20मध्येही 2 विकेट घेतल्या आहेत. 

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी शुभमन गिल, ऋषभ पंत, यशस्वी जैस्वाल, मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांना बांगलादेशविरुद्धच्या या टी20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या ही दोन मोठी नावे संघात समाविष्ट आहेत. वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिल्याने अभिषेक शर्मासारख्या युवा खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची ही मोठी संधी आहे.

हे ही वाचा : Bigg Boss Marathi : ''तुझं बाहेर लफडं असेल...'', निक्कीला असं बोलणं शोभतं?

T20 मालिकेसाठी भारताचा संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकिपर), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, रायन पराग, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (विकेटकिपर), अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव, टिळक वर्मा.

T20 मालिकेसाठी बांगलादेशी संघ : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तन्झीद हसन तमीम, परवेझ हुसैन इमोन, तौहीद हृदयॉय, महमुदुल्लाह, लिटन दास, झाकीर अली, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद, तनझेमफुल, इस्लामाबाद. हसन साकिब आणि रकीबुल हसन.

भारत-बांगलादेश टी20 मालिकेचे वेळापत्रक

पहिला T20- ग्वाल्हेर- 6 ऑक्टोबर
दुसरा T20- दिल्ली- 9 ऑक्टोबर
तिसरा T20- हैदराबाद- 12 ऑक्टोबर

    follow whatsapp